|
पु. सोळा आणे किंमतीचे चांदीचे नाणे . निरनिराळ्या राज्यांत व निरनिराळ्या टांकसाळीतील रुपयांना निरनिराळी नावे होती . त्यांचे प्रमाण पुढील प्रमाणे - कंपनीच्या १०० रुपयांबरोबर १०४ चांदवडी , १०४ चिंचवडी , १०६ भडोच , १०९ बडोदी , बाबाशाई , ११२ खंबायती , १०७ अमदाबादी , ३७९ देसलशाई , १०९ कितुर शापुरी , १२३ औरंगाबादी , १२३ इराणी . ज्या परगण्याचे अगर देशाचे नांव रुपयाला असे त्या परगण्यांत अगर देशांत तो चाले . याशिवाय आणखी पुढील प्रकारचे रुपये होते . - शिक्का , तळेगांवी , पन्हाळी , उखळी , कंची , बेलापुरी , अंकुशी , कोरे , ऐन शिक्का , मलकापुरी , अटीकी , बागलकोटी , नीळकंठशाही , तुटकरी , अरकौटी , इटावा , जरीकडा , काशीशिक्का , फुलचरी , दौलताबाद शिक्का , हुकेरी , गंजीकोट , छत्रपरी . पै ; आण्याचा बारावा भाग . धन ; संपत्ति ; पैसा ; नाणे . रुपया व त्याचे भाग यांना पुढीलप्रमाणे सांकेतिक नांवे आहेत - राम = रुपया ; सीता = अधेली ; लक्ष्मण = पावली ; भरत = चवली ; रामदास = आणेली . [ सं . रुप्यक . रुपे ] जमीन मोजण्याचे एक परिमाण . हे अडीच विघ्यांपर्यंत ( २॥ , ५ , ८ , १० , २० ) निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे आहे . ०मोडणे रुपयाची मान मोडणे - रुपयाची मोड करणे ; रुपयाचे नाणे किंवा खुर्दा करणे . पत्र ; रोखा ; पत्ता ; कोष्टक ; यादी . शादीचा रुका . - रा ७ . २०४ . सोंने ; द्रव्य ; धन . तत्काळ सिद्ध तो करि हरि हरि जैसा सदा रुका सवदे । - मोशांति ६ . ५१ . अर्धा आणा . - इमं ४५ . [ अर . रुकआ ; तुल० सं . रुक्म = सोने ] ०अडका विस्वा पु . पैसा अडका ; संपत्ति . तथापि रुकाविस्वा मिळेना । - गीता २ . २१६५ .
|