Dictionaries | References

राळ उडविणें

   
Script: Devanagari
See also:  राळ करणें , राळ फेकणें

राळ उडविणें     

दंगल माजविणें ; कल्लोल माजविणें . ' कॉंग्रेसच्या सत्याग्रहाच्या चळवळीनें कितीहि राळ उडविलील गेली असली .' - के १० . १२ . १९४० . ( पूर्वी पौराणिक नातकांत राक्षस प्रवेशाच्या वेळीं राळ उडवून मोठा जाळ करीत यावरुन )

राळ उडविणें     

राक्षस प्रवेश करण्याच्या वेळीं राळ उडवीत येत
घाबरवून सोडणें
फट फजिती दैना, दुर्दशा करणें. ‘ पेशव्यांची व ब्राह्मण ’ मुत्सद्यांची आपलें सर्व कसब खर्च करुन राळ उडविली. V.S. २.२४.
यावरुन खूप गाजावाजा करणें, आरडा ओरडा करणें. पौराणिक नाटकांत राक्षसाचें सोंग येत असतांना एक इसम दिवटीवर राळ फेकीत असे. त्यामुळें राक्षसी स्वरुप जास्त प्रखर दिसत असे.
नाश करणें. ‘ आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ। दुरविलीं शुद्ध बुद्धि केली राळ। ’ -तुगा ४०६६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP