Dictionaries | References

मले पहा, फुलं वहा, माहं घर पहा न् थुकून जा

   
Script: Devanagari

मले पहा, फुलं वहा, माहं घर पहा न् थुकून जा     

( व.) मी इतकी सुकुमार आहे व माझें रुप इतकें सुंदर आहे कीं मजकडे पाहण्याबरोबर मजबद्दल आदरबुद्धि तुमचे ठायीं उत्पन्न खास होईल. पण त्याबरोबर मी अशी ऐदी आहे कीं तुम्हीं माझ्या घरांत येऊन पाहाल तर तेथील अव्यवस्थितपणामुळें व घाणेरडेपणामुळें तुमच्या मनाला किळस आल्यावांचून राहणार नाहीं व तुम्ही खास माझा धिक्कार कराल. तेव्हां केवळ रुपानें, बाह्यतः सुंदर असणें पुरें नाहीं तर त्याच्या जोडीला स्वच्छतेची व कष्ट करण्याची संवय पाहिजे. तु ० -( महानु.) मला पहाः शेंदूरफूल वहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP