Dictionaries | References

मनस्वी

   
Script: Devanagari

मनस्वी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Popularly. Lax, licentious, lawless, devious from all law and rule: also capricious, fanciful, freakful--proceedings, deportment; and attrib. the person. 2 sometimes मनस्वार In lax phraseology. Abundant, copious, profusely plentiful. Applied with all latitude. Ex. म0 पाऊस- ऊन-थंड; म0 महाग-सवंग; म0 उंच-खोल-लांब-रुंद- लाहन-मोठा; म0 श्रम-सुख-दुःख. Used also as ad Ex. हा म0 लिहितो-बोलतो-वाचतो-मारतो-खातो- देतो-घेतो.

मनस्वी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Abundant, capricious.

मनस्वी     

वि.  अमर्याद , छांदिष्ट , निधडया छातीचा , बेदरकार , बेलगाम , बेसनदशीर , लहरी , स्वच्छंदी , स्वैर .

मनस्वी     

वि.  
मन स्वाधीन असलेला ; मन जिंकणारा ; संयमी . मृत्यु न म्हणे हा मनस्वी । - दा ३ . ९ . २६ .
बेसनदशीर ; स्वैर वर्तनाचा ; अमर्याद .
स्वच्छंदी ; लहरी ; छांदिष्ट ( काम , वागणूक , स्वभाव , मनुष्य ).
बेदरकार ; निधड्या छातीचा . स्वातंत्र्यासारख्या गोष्टी ज्यांना मिळवावयाच्या आहेत अशा जिगीषूंनीं मनस्वी म्हणजे लोकमान्य टिळकांप्रमाणें निधड्या छातीचें झालें पाहिजे . - धर्मशास्त्रविचार ( काणेकृत ).
पुष्कळ ; अतोनात ; विपुल ; अतिशय . उदा० मनस्वी - पाऊस - ऊन - थंडी ; मनस्वी - उंच - खोल - लहान इ० क्रियाविशेषणाप्रमाणेंहि योजतात . जसें - मनस्वी लिहितो - वाचतो . मनस्वार - वि . ( क्व . ) मनस्वी अर्थ ५ पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP