|
वि. म्हातारपणामुळें दूध देत नसलेली , आटलेली ( गाय , म्हैस इ० ). कां चिखलीं रुतली गाये । धड भाकड न पाहे । - ज्ञा १६ . १४२ . ( विऊन बरेच दिवस झाल्यानें ) दूध देईनाशी झालेली ( गाय ; म्हैस इ० ). - एभा ११ . ५५६ . ज्या दिवशीं काहीं धार्मिक व्रत , विधि नाहींत असा ( धोंड दिवस ) ज्यांत कांहीं फायदा होत नाहीं असा , निरर्थक ( धंदा , जमीन , प्रयत्न इ० ). निरर्थक ; निःसत्व ( अन्न इ० ). ०कथा स्त्री. एका कथेचें अनुसंधान चाललें असतां मध्यें निघणारी दुसरी कथा ; आडकथा . रिकामटेकडें भाषण ; बाष्कळ गप्पा ; लांबलचक , नीरस , कंटाळवाणी हकीगत , गोष्ट इ० झाली ही सर्व भाकड कथाच वाटतं ! वाहवा ! - नाकु ३ . ८६ .
|