Dictionaries | References ब बोळवण बोळवणी Script: Devanagari Meaning Related Words बोळवण बोळवणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. रवानगी ; पाठवणी ; निरोप देणें .नववधूचें नवर्याचे घरीं थाटामाटाचें प्रथम गमन . तिची करावया बोळवण । कृष्णा आंगीं आंगवण । - एरुस्व १५ . ७४ .विवाहानंतर वरपक्षाच्या मंडळीची सत्कारपूर्वक करुन दिलेली रवानगी .गांवात आलेल्या भुतांना अन्नादि बळी देऊन गांवकर्यांनीं त्यांची वाजतगाजत गांवाबाहेर केलेली हकालपट्टी .पाहुण्याबरोबर थोडेसे जाऊन त्याची केलेली रवानगी ; दिलेला निरोप .पाठवणी ; बिदागी ; केलेल्या कामाबद्दल जातांना दिलेली रक्कम .( व . ) ब्राह्मणेतर जातींतील गर्भाधानाचा समारंभ . ( क्रि० करणें ). [ का . बोळु ] बोळवणें , बोळविणें -आलेल्या पाहुण्याबरोबर सत्कारार्थ थोडेसें चालून त्यास निरोप देणें ; रवानगी करणें ; पोहोंचविण्यास जाणें ; विसर्जन करणें ; घालविणें ; पाठविणें . तीन पावलें मातापित्या बोळवाया आली । - वसा ५५ .( विनोदानें ) नाहींसे करणें ; गमाविणें ; ( मित्र , आप्त , विद्या इ० ) विसरुन जाणें . उदा० त्यानें आपली आई बोळविली आणि स्वस्थ बसला .नथ , सुंकलें इ० दागिन्यांचा फासा दुमडून घट्ट बसविणें ; एकरुप करुन टाकणें ; फांसा कशांतहि अडकणार नाहीं किंवा निघणार नाहीं असा बसविणें .बुजविणें ; बंद करणें . बोळावा , वी - पु .मुक्कामापर्यंत पोचविण्यासाठीं बरोबर आलेलीं माणसें ; सोबती ; लवाजमा ; पहारा . पुसतां चुका होतो वाटा । सवें बोळावा गोमटा । - तुगा २४६६ .बोळवण ; बोळवणी ; रवानगी .बिदागी ; पाठवण . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP