|
स्त्री. ( नाविक ) नाळेवरचें शीड . पु. बंब्या पहा पोत्यांतील धान्य नमुन्यासाठीं काढावयाचें हत्यार . पु. ( गो . ) बोम ; लहान मुलास दुध पाजण्याचें कांचेचें भांडें . [ पोर्तु . एंबिगो ] नाळेवरील लहान शीड लावण्यासाठीं असलेलें लांकूड ; नाळेवरील डोलकाठी . तोंडावर हात मारीत मारीत काढलेला मोठा आवाज ; शंखध्वनि ( अति दुःख , महत्संकट , तक्रार किंवा शिमगा यावेळीं केलेला ). ( क्रि० मारणें ; ठोकणें ). हाकाटी ; दुर्भिक्ष . यंदा पाण्याची फार बोंब उडाली . ०पाटली स्त्री. ( नाविक ) दाट्यावर लांकडी बोंब अडकविण्यासाठीं एक आडें ठोकतात तें . याच्या मध्यावर खालच्या अंगास खांचा ठेवितात , कारण बोंब व आढें यांस बांधणारी दोरी या खांचेंतून भरुन घेतात . ०बाटली हांजा - स्त्रीपु . नाळीवरचें शीड वर करण्याची दोरी . पुकारा ; गलबला ; ओरडा . [ देप्रा . बुंबा ध्व . बं ] म्ह० ( राजा ) मृगाआधीं पेरावें व बोंबेआधीं पळावें . ०उठणें बोंब लागणें पहा . भुमका उठणें ; जाहीर होणें . ०पडणें वाजणें होणें - ओरडा होणें ; हाकाटी होणें ; न मिळाल्यामुळें बोभाटा होणें . अत्यंत प्रयासानें मिळणें ; दुर्भिक्ष होणें . ( कोणेकाच्या नांवाची ) ०पडणें एखादें दुष्कर्म अमक्यानें केलें असा बोभाटा होणें . ०पाडणें ( ना . ) ( उपरोधिक ) शतकृत्य करणें ; दिग्विजय करणें ; दिवे लावणें . ०लागणें कळ उठणें ; वेदना होणें ; बोंब उठणें ; वेदनांनीं ओरडण्याइतकें दुःख होणें . एखाद्याच्या नांवानें बोंब मारणें , बोंब मारणें एखादी वाईट गोष्ट अमक्यानें केली असें सांगत सुटणें . काय बोंब मारली ( व . ) कोणती कर्तबगारी केली ? बोंबलणें अक्रि . बोंब मारणें ; बोंब ठोकणें . ( एखादें कार्य किंवा मसलत ) फसणें ; शेवटास किंवा पूर्णत्वास न जातां मध्येंच निःशेष होणें ; कांहींएक निष्पन्न न होणें . ( व . ) टेंभलणें ; मोठ्यानें रडणें . बोंबलता - वि . बोंबलणारा ; बोंब मारणारा . म्ह० रडत्याची शेती बोंबलत्याचें दुभतें . बोंबलपट्टी - स्त्री . मोठा आरडाओरडा ; हाकाटी ; गलबला . स्वतःची फुशारकी ; आत्मस्तुति ; आत्मश्लाघा . बोंबल बाराखडी - स्त्री . अंगीं मुळींच विद्वत्ता नसून पांडित्याची ऐट दाखविणें . बोंबलभिक्या - वि . कपाळकरंटा ; कमनशिबी ; दुर्दैवी . [ बोंबलणें + भीक ] बोंबल्या - वि . नेहमीं वोंबलण्याची किंवा आरडाओरड करण्याची संवय असलेला ; बोंबलणारा . नेहमीं फुरफुरणारा ( घोडा ). म्ह० ( व . ) येरे माझ्या मागल्या पाप न जाई बोंबल्या . बोंबल्या गणेश , हणमंत - पु . वाचाळ , वटवट्या , तोंडाळ इसम . गुप्त गोष्ट मनांत न ठेवणारा मनुष्य . नेहमीं अमंगळ बोलणारा , अभद्रभाषी , रड्या माणूस . [ बोंबलणें + गणेश - हणमंत ] बोंबळी - स्त्री . बोंब . - शर . बोंबाबोंब - स्त्री . भयंकर हाकाटी ; आरडाओरड ( अनर्था मुळीं झालेली ). कां मग बोंबाबोंब । - टिळक . [ बोंब द्वि . ] बोंबाळ - पु . गोंधळ ; धांदल ; दंगलधुमाकूळ ; गडबड ; धामधूम ( मेजवानी इ० मध्यें ). म्ह० गावांत लगीन कुत्र्याला बोंबाळ . बोंबाळणें - उक्रि . गोंधळांत सांपडणें ; त्रासांत अडकणें ; गोंधळून जाणें ; गडबडून जाणें . गोंधळ करणें ; गडबड उडवून देणें ; गोंधळांत पाडणें ; त्रास देणें . बोंबो - वि . ( गो . ) वेडा ; मूर्ख . बोंब्या - पु . गयेमधील एक पंड्या ; हा यात्रेकरु आले म्हणजे त्यांच्या पुढें बोंब मारीत जातो . हाकारा करणारा नोकर . त्यांत बोंब्या निघून गेला । - ऐपो ५२ . ( थोड्याशा दुखापतीमुळें किंवा भीतीमुळें ) मोठी ओरड करणारा ; बोंबलणारा . काम फत्ते करुन न येणारा ( एक शिवी )
|