Dictionaries | References ब बुंदसे गई वो हौदसे आती नहीं Script: Devanagari Meaning Related Words बुंदसे गई वो हौदसे आती नहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ( हिं.) क्षुल्लक गोष्टीकरितांहि एकदां नापत झाली म्हणजे ती कितीहि मोठया गोष्टीनें भरुन येत नाहीं. एकदां बादशहा व बिरबल एकत्र बसले असतां बादशहा अत्तर लावीत होता त्याचा एक थेंब खालीं पडलातो फुकट जाऊं नये म्हणून बादशहानें जमिनीवरुन बोटानें पुसून घेतला व हातास लावला. हें बिरबलानें पाहून त्याच्याकडे जरा तुच्छतादर्शक दृष्टीनें पाहिलेंकारण बादशहाला एक अत्तराचा थेंब फुकट गेलेला सहन होत नाहीं असें त्यास दिसून आलें. बादशहाच्या ही गोष्ट लक्षांत येऊन बिरबलाच्या मनांतील हा किंतु निघून जावा म्हणून त्यानें एका दिवशीं मजलसींत अत्तरांचे हौद भरुन ते लोकांच्या अंगावर उडविले. त्यावेळीं बिरबल बादशहाकडे पाहून म्हणाला कीं, ‘बुंदसे गईवो हौदसे आती नहीं. ’ ‘ आतां बोलावण्यांत काय अर्थ आहे ? बुंदसे गयी वो हौदसे नहीं अती. ’ -प्रतिज्ञा २७७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP