Dictionaries | References

नागवणूक

   
Script: Devanagari
See also:  नागवण , नागवणे

नागवणूक

   स्त्रीन . १ लुटालूट ; दरोडा ; लुबाडणे . ( चोर , राज इ० नी ). २ सरकारी खंड ; दंड . मग राजा पुसेल आपणाकारण । तरी पडेल नागवण ते देऊं । - भावि ५४ . १५४ . ३ व्यापारांतील तोटा . ४ ( सामा . ) द्रव्यहानि ; बुडवणूक .( क्रि० घेणे ; घालणे ). ५ द्रव्यापहारामुळे होणारी दुर्दशा , लुबाडल्यामुळे झालेली अवस्था . न पाविजे कदा उन्मत्त झालिया । दंभ तोचि वायां नागवण । - तुगा २१ . ६ . लूट . विषयदेशीचे नागवणे । आणीत जे । - ज्ञा १८ . ४६४ . - एरुस्व १२ . ३८ . [ नागविणे ] म्ह ० ( गो . ) समर्थाची सांठवण दुर्बळांची नागवण . नागवणा - वि . नागविणारा . नाही माझे मनी । पोरे रांडा नागवणी । - तुगा ३११७ . नागविणे - उक्रि . १ नागवे ; वस्त्रहीन करणे . - ज्ञा ११ . ४६९ . २ लुटणे ; जुलूम करणे ; लुबाडणे ; बुचाडणे . साध्वी शांति नागविली । - ज्ञा ३ . २९१ . ३ . फसविणे . नागविले भगवे योगी । समाधिभ्रमे । - ज्ञा १६ . २९८ . - अक्रि . लुटला ; लुबाडला जाणे . बहु पांगविलो बहु नागविलो । बहु दिसझालो कासावीस । - तुगा १५०५ . [ नागवे करणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP