Dictionaries | References

देहीं देवाची वस्ती, आणि मानव फिरतो रस्तो रस्तीं

   
Script: Devanagari

देहीं देवाची वस्ती, आणि मानव फिरतो रस्तो रस्तीं

   मनुष्याच्या शरीरांतच परमेश्वराचें अस्तित्व असून मनुष्य परमेश्वर प्राप्तीसाठी रानोमाळ भटकत असतो. तु०-(अ) देहींच देव असतां कां रे भ्रमतोचि व्यर्थ तूं रानीं। नाभिंत सुगंधि असुनी कस्तुरिमृत जेविं तो फिरे रानीं॥ (आ) देहीं असोनिया देव। वृथा फिरतो निर्दैव। देव आहे अंतर्यामी। व्यर्थ हिंडे तीर्थाश्रमीं । नाभी मृगाचे कस्तुरी। व्यर्थ हिंडे वनांतरी। साखरेचें मूळ ऊंस। तैसा देहीं देव दिसे। दुधीं असतां नवनीत। नेणें तयाचें मथित। तुका सांगे मूढ जना। देही देव कां पहाना ॥-तुगा ४४३१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP