Dictionaries | References

तुंबाडा

   
Script: Devanagari
See also:  तुंबा , तुंबारा

तुंबाडा     

 पु. १ बंधारा ; बांध ; पाणी अडविण्याचे साधन . २ अडविल्यामुळे सांचलेले पाणी . ३ ( ल . ) तुंबलेले सांचलेले काम . ४ तुंबून रहावयाची अवस्था ; एकत्र सांठणे ; तुंबणे ( पाण्याचे ). ५ पाणी इ० तुंबावे म्हणून मोरी इ० छिद्रांत घालावयाचा बोळा . ६ अवष्टंभ ; अवरोध ; सांकळ ( रक्ताचे ) रक्ताचा भलत्याच ठिकाणी तुंबारा होऊन त्यामुळेच ते मृत्यु पावतात . - ब्रावि ६५ . ७ प्रतिबंध नाहीसा झाल्यामुळे , एक तोंड पडल्यामुळे ( रक्त पाणी इ० चा ) सवेग चालणारा मोठा प्रवाह . ( क्रि० लागणे ; धरणे ; फुटणे ; सुटणे ; सोडणे ). रक्ताचा तुंबारा लागून रक्तबंबाळ झाले .
०सोडणे   पुष्कळ रक्त , पाणी वगैरे एकदम सुटल्यामुळे वाहू लागणे . तुंबाडा सोडल्यासारखे तोंड वार्‍यास देऊं नये . [ तुंबणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP