Dictionaries | References त तावत Script: Devanagari Meaning Related Words तावत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. तितके ; तेवढे . यावत्संख्यांक ब्राह्मणं तूं सांगीतलेस तावत्संख्याक मी आणिले . - क्रिवि . तोपर्यंत , तोपावतो ; तावत्कालपर्यंत . याच्या जोडीचा शब्द यावत . या शब्दाचा मराठीत स्वतंत्र उपयोग नाही . तावत्काल , तावत्कालपर्यंत , तावत्पर्यंत इत्यादि सामासिक शब्दांत मात्र उपयोग करितात . [ सं . ] सामाशब्द -०काल कालपर्यंत क्रिवि . तोपर्यंत ; त्या वेळेपावेतो ; तितका वेळ .०पर्यंत क्रिवि . विवक्षित कालापर्यंत ; विवक्षित स्थळापर्यंत , अंतरापर्यंत ; तोपर्यंत ; तेथवर . तावन्मात्र क्रिवि . १ जरुर तितकेच ; तितकेच ; जरुरीपुरतेच ; याच्या जोडीचा शब्द यावन्मात्र २ ( व्यापक . ) यथातथा ; जेमतेम पुरेल इतके थोडे ; म्हणण्या जोगे नसलेले ; माफक ; थोडेसे . आपण शिके जाऊन । तावन्मात्र शिके जाण । सवेचि विस्मृति होय त्यासी । - गुच १७ . २१ दुभते सांगण्याजोगे नाही , तावन्मात्र आहे . [ सं . तावत + मात्र ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP