Dictionaries | References ठ ठी Script: Devanagari Meaning Related Words ठी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To agree, coincide, correspond; to fall together genially. ठी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्री . १ एका ठिकाणीं हरकत आल्यामुळें ज्या दुसर्या ठिकाणीं एखादा माणूस जातो तें ठिकाण ; लिहिणें , वाचणें , गप्पा मारणें इ० करीत असतां कांही अडथळयामुळें तें तसेंच अर्थवट सोडून दिलेलें स्थळ ; एखादी गोष्ट सिध्द करण्याचे उपयोगी आरंभापासून शेवटपर्यंतची कृति . २ ठराविक वेळ , स्थळ , मुक्काम . जै उपसंहरूनि कीजेल ठी । - ज्ञा ७ . ३० . ३ योग्य , चोख व्यवस्था , युक्ति , मार्ग , रीत इ० ४ निंदा ; दोष . जो अमृतासि ठी ठेवी । - ज्ञा १० . ३०० . ६ स्मरण ; आठवण . प्रतिक्षणीं काय ठी । करीतसे । - अमृ ७ . १८२ . ७ मर्यादा ; शेवट ; सीमा . सकळां ज्ञानाचां सेवटीं । करूनि आगमा ठी । - ऋ ३ . [ सं . स्थिति - ठिइ - ठी ] ठीस ठी मिळणें - ( एका अर्धवट कवीच्या गोष्टीवरून ) होकार देणें ; कबुली देणें ; जुळणें ; जमणें ; अनुकूल असणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP