|
न. १ बुध्दि ; विषयाचें आकलन करण्याचें सामर्थ्य २ मनोव्यापाराचा विषय , शास्त्र . ३ बातमी ; माहिती . ४ विषय ग्रहणाचा बुध्दीवर झालेला संस्कार ; मनावरचा ठसा , समजूत . ५ ब्रह्मज्ञान ; सृष्टींत अनेकप्रकारचे जे अनेक विनाशी पदार्थ आहेत त्या सर्वांत एकच अविनाशी परमेश्वर भरून राहिला आहे असें जाणणें ; ब्रह्मात्मैकज्ञान . - गीर ७१३ . अध्यात्मविद्या . [ सं . ज्ञा = जाणणें ] ०कमळ न. १ एक रांगोळी काढण्याचा प्रकार . २ ( योग ) शरीराच्या ठिकाणीं कल्पिलेल्या आठ कमळांपैकीं प्रत्येक . ०कळा स्त्री. बुध्दिवैभव ; बुध्दिप्रभाव . कौशल्य ज्ञानकळा परम । २ शहाणपणाचा प्रकाश ; बुध्दीची , जाणिवेची भूमिका ; जाणण्याची कला . आंगीं ज्ञानकळा आली म्हणजे दुराचार घडत नाहीं . ३ जाणतीकळा पहा . ०कळेपार वि. मनुष्याच्या बुध्दीच्या आटोक्याच्या बाहेर ; बुध्दीला अगम्य . ०कांड न. त्रिकांड वेदांतील आत्मज्ञानाचें प्रतिपादन केलेला भाग ; आरण्यकें व उपनिषदें ( यांत यज्ञयागादि कर्म गौण व ब्रह्मज्ञानच काय तें श्रेष्ठ असतें ). - गीर २८७ . याच्या उलट कर्मकांड . ०कोश पु. १ ज्ञानाचा संग्रह , सांठा . २ विविध विषयांची माहिती ज्यांत दिली असते असा कोश ; ( इं . ) एन्सायक्लोपीडिया . ३ मराठींतील असा ग्रंथ . ०गुरु पु. १ ज्ञान देणारा , शिकविणारा शिक्षक . २ महावाक्योपदेशेंकरून ब्रह्म प्रत्ययास आणून देणारा , मोक्षगुरु . ०घन वि. परिपूर्ण ज्ञानस्वरूप असलेला ; ज्ञानानें पूर्णपणें भरलेला . महाराज राज सद्गुरु . ज्ञानघना । ०चक्षु दृष्टि - पु . बाह्येंद्रियांच्या विषयापलीकडील आत्मस्वरूप जाणण्याचें ज्ञान , बुध्दि , मनःचक्षु . - वि . एतद्विशिष्ट ( मनुष्य ). ०जनक वि. ज्ञान दान करणारा . ०दिवा दीप - पु . बुध्दिरूपी दिवा . अंतरिचा ज्ञानदिवा मालवूं नकोरे । ०निष्ठा स्त्री. ज्ञानोत्तर सर्व कर्मे सोडून देऊन ज्ञानांतच गढून जाण्याची सिध्दावस्थेंतील स्थिति . - गीर ४१२ . ०परंपरा स्त्री. १ एकामागून एक येणार्या विचारांमुळें , माहितीमुळें झालेलें ज्ञान . २ वाढतें ज्ञान . ०मठ मठी - पुस्त्री . १ अध्यात्म ज्ञानाचा अथवा ध्यानयोगाचा अभ्यास करण्यासाठीं बांधलेला आश्रम ; एकांतस्थान . २ ( ल . ) तुरुंग ; कारागृह . ज्ञानमठांत बसणें - १ सांसारिक बंधनांतून पराङ् मुख होऊन आध्यात्मिक चिंतनांत काळ घालविणें . २ स्वतःच्या शहाणपणाबद्दल घमेंड , गर्व बाळगणें . ०मार्ग पु. ईश्वर प्राप्तीचा वेदांचा शास्त्रोक्त रास्त , मार्ग ; अव्यक्तोपासनेची साधनावस्थेंतील स्थिति दाखविणारी रीत . - गीर ४१२ . ०मार्गी वि. ज्ञानमार्गाचा अवलंब करणारा ; ब्रह्मज्ञानाच्या मागें असणारा . ०माला माळ माळा - स्त्री . १ स्वाध्यायास प्रारंभ करतांना शिष्याच्या , पुत्राच्या गळयांत गुरूकडून किंवा पित्याकडून घातली जाणारी माळ . २ ही माळ घालण्याचा संस्कार . ३ ( ल .) जगाचें ज्ञान ; व्यवहारज्ञान . ०यज्ञ पु. ज्ञानप्राप्ति ; परमेश्वर स्वरूपाचें ज्ञान करून घेऊन त्या ज्ञानाला अनुरूप अशा आचरणानें परमेश्वराची प्राप्ति करून घ्यावयाचा मार्ग , साधन . - गीर ६८० . ०रत्नाची स्त्री. ज्ञानी , शहाणा माणूस . याबद्दल गौरवानें म्हणतात . [ ज्ञान + मांदूस = पेटीं ] मांदुस स्त्री. ज्ञानी , शहाणा माणूस . याबद्दल गौरवानें म्हणतात . [ ज्ञान + मांदूस = पेटीं ] ०लक्षण न. १ ज्ञानसाधनाचें चिन्ह ; खूण . २ बुध्दिलक्षण . ०बल्ली स्त्री. ( थट्टेनें ) भांग . ०वाद पु. १ ( तत्त्वज्ञान ) ज्ञानानेंच मोक्ष प्राप्ती होते , मुक्ति मिळते हें तत्त्व ; व त्या तत्त्वाचें समर्थन . २ ( इं . ) ग्रॉस्टिसिझम् . ०वान् वि. १ शहाणा ; ज्ञानी . २ अध्यात्मज्ञान असणारा ; ब्रह्मज्ञानी . वि. १ शहाणा ; ज्ञानी . २ अध्यात्मज्ञान असणारा ; ब्रह्मज्ञानी . ०वायु पु. एक वातरोग . हा झाला असतां माणूस गहन विषयावर विद्वत्तापूर्ण बडबड करीत सुटतो . ०विग्रह पु. ज्ञानरूपी शरीर असलेली ( देवता ). ०विज्ञान न. १ आध्यात्मिक ज्ञान आणि आधिभौतिक किंवा शास्त्रीय ज्ञान . २ अध्ययनापासून मिळालेलें ज्ञान आणि अनुभवजन्य किंवा प्रत्यक्ष ज्ञान . ३ वाङ् मय आणि शास्त्र . ०शक्ति स्त्री. १ ज्ञानेंद्रिय पंचक . २ बुध्दिसामर्थ्य . ०सूर्य ज्ञानार्क - पु . ज्ञानरूपी सूर्य . ज्ञानसूर्य उगवला देहामाजी । ०स्पृश् वि. ज्ञानाला स्पर्श झालेलें ; जाणलेलें ; समजलेलें . ज्ञानांजन - न . ज्ञानरूपी अंजन , काजळ ; ज्ञानोपदेश . नयनीं लेइलें ज्ञानांजन . ज्ञानाभ्यास - पु . अध्यात्मज्ञानाचें चिंतन ; ब्रह्मज्ञानाचा अभ्यास , चिंतनमनन ज्ञानाभ्यासी - वि . सदोदित ब्रह्मचिंतन करणारा . याच्या उलट कर्मसंगी . ज्ञानार्थ - पु . ज्ञानरूप , ज्ञानाचा विषय . हे असो आतां वाजटा । तो ज्ञानार्थ करूनि गोमटा । - ज्ञा १४ . २६ . [ ज्ञान + अर्थ ] ज्ञानाज्ञान - न . पारलौकिक ज्ञान व ( अन्यथा ) ऐहिक विषयांचें ज्ञान . - ज्ञा १५ . ५०३ [ ज्ञान + अज्ञान ] ज्ञानी , ज्ञानिया - वि . १ ज्ञाता ; शाहणा , जाणणारा ; विद्वान ; सुज्ञ . २ आध्यात्मिक , पारमार्थिक ज्ञान असणारा ; ब्रह्मज्ञानी . तिज अथार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा । - ज्ञा ७ . १०९ ; एभा ११ . २४९ . [ सं . ज्ञानिन् ] ज्ञानेंद्रिय - न . ज्यांच्याद्वारें वस्तूंचें ज्ञान होतें अशीं त्वचा , नेत्र , जिव्हा , कान , नाक हीं पांच इंद्रियें प्रत्येकीं . याच्या उलट कर्मेद्रिय . या पांचांच्या समूहास ज्ञानेंद्रियपंचक म्हणतात . [ सं . ] ज्ञानोपदेश - पु . अध्यात्मज्ञान ; आत्मज्ञान याचा उपदेश , बोध . ( क्रि० करणें ; देणें ). [ सं .] ज्ञानोपासना - स्त्री . उपासनेचा तिसरा प्रकार . वेद व शास्त्रें यांच्यापासून ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न , मार्ग , ( कर्मोपासना व आत्मोपासना हे उपासनेचे पहिले दोन प्रकार आहेत ). [ सं .] वि. ज्ञानाला स्पर्श झालेलें ; जाणलेलें ; समजलेलें . ज्ञानांजन - न . ज्ञानरूपी अंजन , काजळ ; ज्ञानोपदेश . नयनीं लेइलें ज्ञानांजन . ज्ञानाभ्यास - पु . अध्यात्मज्ञानाचें चिंतन ; ब्रह्मज्ञानाचा अभ्यास , चिंतनमनन ज्ञानाभ्यासी - वि . सदोदित ब्रह्मचिंतन करणारा . याच्या उलट कर्मसंगी . ज्ञानार्थ - पु . ज्ञानरूप , ज्ञानाचा विषय . हे असो आतां वाजटा । तो ज्ञानार्थ करूनि गोमटा । - ज्ञा १४ . २६ . [ ज्ञान + अर्थ ] ज्ञानाज्ञान - न . पारलौकिक ज्ञान व ( अन्यथा ) ऐहिक विषयांचें ज्ञान . - ज्ञा १५ . ५०३ [ ज्ञान + अज्ञान ] ज्ञानी , ज्ञानिया - वि . १ ज्ञाता ; शाहणा , जाणणारा ; विद्वान ; सुज्ञ . २ आध्यात्मिक , पारमार्थिक ज्ञान असणारा ; ब्रह्मज्ञानी . तिज अथार्थी जाणिजे । ज्ञानिया चौथा । - ज्ञा ७ . १०९ ; एभा ११ . २४९ . [ सं . ज्ञानिन् ] ज्ञानेंद्रिय - न . ज्यांच्याद्वारें वस्तूंचें ज्ञान होतें अशीं त्वचा , नेत्र , जिव्हा , कान , नाक हीं पांच इंद्रियें प्रत्येकीं . याच्या उलट कर्मेद्रिय . या पांचांच्या समूहास ज्ञानेंद्रियपंचक म्हणतात . [ सं . ] ज्ञानोपदेश - पु . अध्यात्मज्ञान ; आत्मज्ञान याचा उपदेश , बोध . ( क्रि० करणें ; देणें ). [ सं .] ज्ञानोपासना - स्त्री . उपासनेचा तिसरा प्रकार . वेद व शास्त्रें यांच्यापासून ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न , मार्ग , ( कर्मोपासना व आत्मोपासना हे उपासनेचे पहिले दोन प्रकार आहेत ). [ सं .]
|