वि. - सर्वश्रुत ; प्रसिध्द ; सर्वास कळविलेलें ; व्यक्त . ते खबर जाहीरा होऊनु . - रा १५ . २७४ .
- सार्वजनिक रीतीनें प्रख्यात .
- विदित : माहीत . हे खबर च्यारो पादशाहासी जाहीर जाहाले . - इम १३ .
- छापील ; प्रकाशित . [ अर . झाहिर ]
०खबर स्त्री. जाहिरात ; नोटीस .
जाहीरणें - प्रसिध्द होणें .
- उघड होणें . अथर्वण खोटा जाहीरला . - रा ८ . ४३ .
०दारी स्त्री. - प्रसिध्दी .
- बाह्य देखावा ; बाह्यात्कार . जाहीरदारीनें सफाई ठीक नाहीं . दिलापासून साफ व्हावें . - रा ५ . १६७ .
- बाह्य सलोखा ; वरपांगी मैत्री . सरदारांशीं आपसांत चित्तशुध्दता नाहीं , जाहीरदारी मात्र परस्परें आहे . - दिमरा १ . ३१८ .
- जाहिरी ; प्रसिध्दि . अद्यापि मसलतीचें वर्तमान जाहीरदारींत आलें नाहीं . - दिमरा १ . २०९ .
०नामा पु. - प्रसिध्दि ; डांगोरा ; दवंडी .
- जाहीर केलेला लेख ; सरकारचें प्रसिध्दीपत्रक ; नोटीस .
- ( पाटबंधारे खातें ) मुख्य पिकांत जें दुसर्या जातीचें पीक थोडें थोडें मिसळलेलें असतें तें .
०सभा स्त्री. जाहीर ठिकाणीं भरलेली सभा ; सर्वांना जेथें येण्यास आडकाठी नाहीं अशी सभा .
जाहिराणा , जाहिरी पुस्त्री . प्रसिध्दि ; उघडीक
; जहूर . ही गोष्ट आपणास कळावी म्हणून लिहिलें आहे , जाहिराण्यांत आणूं
नये . - ख ८ . ३९२५ .
क्रिवि . प्रसिध्दपणें ; उघडपणें - रीतीनें ;
लौकिकांत . परंतु जाहिराणा तर यादीप्रमाणेंच कबूल करावें म्हणतील . -
रा १२ . १२४ .
जाहिरात स्त्री . - प्रसिध्दीपत्रक ; जाहीरनामा
; प्रसिध्दीचें साधन .
- स्वत : तयार केलेल्या अथवा आणविलेल्या मालाचीं
किंवा स्वत : च्या धंद्याचीं वृत्तपत्रें ; भिंतीवरील बोर्ड ,
माहितीपत्रें , कॅटलॉग वगैरे साधनामार्फत जी प्रसिध्दि केली जाते ती .
विसावें शतक हें जाहिरातीचें युग आहे .
- कळविणें ; प्रसिध्दि देणें . (
क्रि० देणें ; करणें ; लावणें ).
क्रिवि . प्रसिध्दपणें . जाहिरात
अगर अन्तरगती या गोष्टीस त्याचें अनुमत नसावें . - रा १२ . १२३ . [ अर .
झाहिरात ]
जाहिरी स्त्री . प्रसिध्दि ; जहूर .
यकसखुनीपणाची नेकी व खुबी सर्व टोपीकरांत जाहिरीस येई तें करणें वाजीब व
लाजीम आहे . - रा १० . २८० .
जाहिरींत क्रिवि . बाह्यत :. जाहिरींत बहुत स्नेह दाखवून , - दिमरा २ . ९४ .