Dictionaries | References

घोंगडें

   
Script: Devanagari

घोंगडें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. Ex. ह्या चौघानीं माझें घों0 केलें.

घोंगडें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A black blanket of one breadth. (With गळ्यांत &
  घालणें) A clog, load, encumbrance; care or trouble; a burdensome but imperative task. Mess or pickle made of one.

घोंगडें     

 न. १ घोंगडी अर्थ १ पहा ; कांबळयाचें एक पट्टें . २ कांबळें . ३ लचांड ; लोढणें ; पायखोडाबिडी ; दुस्सह , दुर्वाह्य परंतु करणें अवश्य असलेलें काम इ० . ४ ( शिव्या देऊन धक्के मारून , उपहास करून एखाद्याची केलेली ) फजीती ; त्रेधा ; हबेलंडी ; दुर्दशा . ह्या चौघांनीं माझें घोंगडें केलें . [ घोंगट ] ( वाप्र . )
०गळयांत   , गळयांत पडणें - एखादें लचांड मागें लागणें ; त्याच्या गळयांत पोराचें घोंगडें पडलें आहे . ( एखाद्याच्या गळयांत ) घोंगडे घालणें - एखाद्यास कांहीं उपद्रवकारक काम सांगणें ; एखाद्याच्या मागें त्रासदायक कर्तव्य , लचांड लावून देणें . तो , लचांडी आहे , तुमच्या गळयांत एखादें घोंगडें घालील . म्ह० गरिबाचें गेलें घोंगडें गरीब पडलें उघडें . सामाशब्द - घोंगडगुंची - स्त्री . ( बे . ) पाऊस निवारण्यास वापरावयाची घोंगडयाची कुंची . [ घोंगडें + कुंची ] घोंगडबाऊ - पु . द्वाड मुलांना भिवविणारा घोंगडें पांघरलेला मनुष्य ; बागुलबोवा . [ घोंगडें + बाऊ ] घोंगडया - वि . १ ( ल . ) घोंगडी पांघरणारा ; ( यावरून ) गरीब कामकरी , मजूर . २ काळया रंगाचा मोठा सुरवंट .
येणें   , गळयांत पडणें - एखादें लचांड मागें लागणें ; त्याच्या गळयांत पोराचें घोंगडें पडलें आहे . ( एखाद्याच्या गळयांत ) घोंगडे घालणें - एखाद्यास कांहीं उपद्रवकारक काम सांगणें ; एखाद्याच्या मागें त्रासदायक कर्तव्य , लचांड लावून देणें . तो , लचांडी आहे , तुमच्या गळयांत एखादें घोंगडें घालील . म्ह० गरिबाचें गेलें घोंगडें गरीब पडलें उघडें . सामाशब्द - घोंगडगुंची - स्त्री . ( बे . ) पाऊस निवारण्यास वापरावयाची घोंगडयाची कुंची . [ घोंगडें + कुंची ] घोंगडबाऊ - पु . द्वाड मुलांना भिवविणारा घोंगडें पांघरलेला मनुष्य ; बागुलबोवा . [ घोंगडें + बाऊ ] घोंगडया - वि . १ ( ल . ) घोंगडी पांघरणारा ; ( यावरून ) गरीब कामकरी , मजूर . २ काळया रंगाचा मोठा सुरवंट .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP