Dictionaries | References

भिजट

   
Script: Devanagari
See also:  भिजकट , भिजका , भिजगट

भिजट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   slightly wetted.

भिजट

 वि.  किंचित भिजलेला ( भिजण्यानें अपकार होईल तेव्हां योजतात ). [ भिजणें ] भिजण - स्त्री .
   भिजत घातलेली डाळ , धान्य ( भाजण्याकरितां , भरडून डाळ करण्याकरितां ).
   उसळीसाठीं भिजत घातलेली असली डाळ , धान्य . भिजणूक - स्त्री . भिजणें ; ओलें होणें ; भिजल्याची स्थिति . ( क्रि० पडणें , होणें ). भिजणें - अक्रि .
   ओलें होणें ; आर्द्र होणें .
   ( ल . ) ओलसर , दमट , सर्द . भरभराटीचें उत्कर्षाचें होणें ( काम , स्थिति ). ओलाकोरडा पहा .
   लांच घेणें . [ सं . अभिषेचनम ( सिंच = शिंपडणें ); हिं . भीजना ] ( वाप्र . ) ( एखाद्याच्या घरीं ) हात भिजणें - जेवण्याचा प्रसंग येणें . भिजत कांबळें - ( कांबळें लोंकरीचें असल्यामुळें तें फार वेळ पाण्यांत ठेवल्याशिवाय भिजत नाहीं यावरुन ल . ) ( एखादें काम ) लोंबत , अनिश्चित ठेवणें . ( क्रि० घालणें , ठेवणें ) भिजत पडणें , भिजतकांबळें , घोंगडें पडणें - ( एखादें काम ) लोंबत , अनिश्चित पडणें . भिज पाऊस - पु . जमीन चांगली भिजवणारा पाऊस . याचे उलट फटकर्‍याचा पाऊस . भिजवण - न .
   भांड्यास चिकटलेलें अन्न , खरकटें इ० ओलें करुन काढण्याकरितां भांड्यास लावलेली भिजलेली राख , माती .
   भाकरी इ० कोरडा पदार्थ सुलभतेनें खातां येण्यासाठीं त्याबरोबर घेतात तें दूध , ताक इ० .
   ज्यांत दुसरा कोणताहि पदार्थ भिजविला जातो असा पदार्थ . [ भिजविणें ] भिजवणी , भिजवणूक - स्त्री .
   भिजविणें ; भिजत ठेवणें .
   भिजविलेपणा ; आर्द्रपणा . भिजवणी करणें - सक्रि . ( कु . ) नांगरण्यासाठीं जमीन भिजविणें . भिजवाण - स्त्री . ( कु . ) जमीन भिजवून भात पेरणें . भिजविणें - सक्रि .
   ओलें करणें .
   ( ल . ) एखाद्याचा हात ओला करणें ; लांच देणें . [ भिजणें ] हात भिजविणें - सक्रि . ( ल . ) लांच देणें . भिजाणा - पु . भिजलेला दाणा ; पाण्यांत घालून फुगविलेला हरभरा इ० . ( अनेकवचनी योजतात . ) [ भिजणें + दाणा ] भिज्वण - स्त्री . ( गो . ) तांदुळांशिवाय स्वैंपाकास लागणारें सामान ; शिधा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP