Dictionaries | References

घवघवीत

   
Script: Devanagari
See also:  घवघवित

घवघवीत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Strong, sweet, and diffusive--an odor. Ex. कर्पूर गौर गंगासहित ॥ घ0 विराजित ॥.

घवघवीत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Large, fine, showy. Full, plumportly. Strong, sweet, and diffusivean odour.

घवघवीत     

वि.  ठसठशीत , ठळ , डोळ्यांत भरण्यासारखा , भरदार , भव्य , मजबूत ;
वि.  घमघमीत ;
वि.  चमचमीत .

घवघवीत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : ठळक

घवघवीत     

वि.  १ पहातांच डोळयांना आनंद देणारा ; डोळयांत भरणारा ; भरदार ; भव्य . २ गोंडस ; गुबगुबीत ; धष्टपुष्ट ; मोठा आणि देखणा ( पुरुष , स्त्री ). घवघवीत डोळां पहाताती । - रामदासी २ . १२२ . ३ ठळक ; ठसठसीत ; भरदार ; डोळयांत भरणारा ( दागिना , डोळा ); हलका , खुरटा , बारीक याच्या उलट . ४ खूप दागिने घालून शोभणारी ( स्त्री , मुलगी ); तेजस्वी ; भव्य ; शोभणारा ; भरदार ( चेहरा , मुख ). कांसे कशिला सोनसळा । अपाद रुळे वनमाळा । घनसांवळा घवघवित ॥ - एभा ३ . ५५१ . वदे ते अंबेसी घवघवित जीचा मुखविधू । - सारुह ८ . ८७ . रत्नभूषणीं घवघवीत । - मुआदि ५ . ६ . ५ ठळक ; स्पष्ट ; मोठा ; चांगला ऐकूं येणारा . घंटाघोष घवघवीत । - मुवन १३ . १०६ . ६ चमचमीत ; उंची खाद्य पदार्थांनीं भरलेलें ( जेवणाचें ताट , पान ). वाढिलेंच असें घवघवीत । - रामदासी २ . ८१ . ७ दरवळणार्‍या सुगंधानें युक्त ; सुवासाच्या घमघमाटानें युक्त . [ घवघव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP