Dictionaries | References

घर जळल्‍यावरी, पाण्याचा शोध करी

   
Script: Devanagari

घर जळल्‍यावरी, पाण्याचा शोध करी

   घराला प्रत्‍यक्ष आग लागल्‍यावर पाणी शोधीत फिरावयाचे म्‍हणजे आधी कोणतीहि तजवीजकरतां आयत्‍यावेळी उपाय शोधावयास पाहावयाचे. याप्रमाणें आगाऊ कोणतीहि काळजी न घेतां केवळ निष्‍काळजीपणानें असणें. तु०-संदीप्ते भवने तु कूपखननं प्रत्‍युद्यमः कीदृशः।-सुर १७८.१००७. चिन्तनीयाहि विपदामादावेव प्रतिक्रियाः। न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वन्हिना गृहे।-सुर १५३.१७. येरवी ऐसे घडे। जो जळत घरी सापडे। तो मग न पवाडे। कुंहा खाणों। -ज्ञा १३.५४९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP