Dictionaries | References

खवखव

   
Script: Devanagari

खवखव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

खवखव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

खवखव

 ना.  खाज , चुरचुर ( तोंडाला सुटलेली );
 ना.  खुमखुमी , मस्ती , सुरसुरी ;
 ना.  प्रबल इच्छा .

खवखव

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  घशाला सुटणारी खाज   Ex. अळूच्या पदार्थात आंबट घातल्याने खवखव होत नाही.

खवखव

  स्त्री. अळु . सुरण इ० पदार्थ खाल्लयानें तोंडास किंवा जिभेला सुटणारी खाज किंवा चुरचुर ; खाजण्याची विकृति २ ( ल .)( भुकेमुळें पोटांत तोडणें . ३ पश्नात्तापाची बोचणी लागणें . ४ तीव्र इच्छा , वासना ( विशेषत ; सुरताची ). ' इंद्रियाची खवखव सतत वाढत्या प्रमानावर असल्यामुळें ... कधींहि तृप्त होत नाहीं .' - गीर १०५ . ५ लोभ . हावरटपणा . ६ मस्ती ; सुग्सुरी ; खुमखुमी ( वादविदाची , लढण्याची ). ' बंडखोरावर सुड उगविण्याला ... त्याचें हात खवखव करीत होते . ७ उत्कंठा ; उत्सुकता ; चेतना ; उद्वोधन ; जागृति ( सामग्री , सन्निधान इ० कारणांमुळें होणारी ) .' तो गाऊं लागतांच याला खवखब सुटलीं .' ८ ( विस्तवाची ) धगधग ( सं . अ क्षु - क्षव , क्षिव - थुंकणें , बाहेर टाकणें .?)
  स्त्री. गडबड ; बंडाळी ; दंगाधोपा . ' आवदा याच्या मनात मालव्यांत खवखव करावयाची फार आहे .' - पेद १० . २७ . ( ध्व .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP