Dictionaries | References

खरुज

   
Script: Devanagari

खरुज

  पु. कुणबी स्त्रियांच्या डोकींतील एक चांदीचा राखडीसारखा दागिना .
  स्त्री. कंडु , खाज सुटणें इ० चा रोग ; एक त्वचेचा रोग ; ह्या रोगाचें किडे कातडीखाली अगदीं लहानसा खळगा करुन राहतात . त्यांत मादी अंडी घालुन तेथेंच मरतें . अंडीलवकरच उबुन नवे जीव तयार होतात . ही क्रिया होतांना फार खाज सुटते व खाजवून खाजवून तेथें लहान लहान फोड येतात तें फुटलें म्हणजे हे नवे जीव कातडीवर येतात . खरूज सांसर्गिक रोग आहे . प्राणी आणि आरोग्य ६१ . खरजेवर औषध - आडु ळशांची कोंवळीं पानेंहळद हीं तुळशीच्या रसांत अगर गोमुत्रांत द्वाड . ( सं . खर्जु .) कांडळून - खजावुन खरुज काढणें - आपल्यावर संकट अथवा अनर्थ ओढवून घेणे : भांडण उपस्थित करणें ; शत्रुस जागें करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP