|
पु. ( कों .) १ सुरमाड किंवा भेरला नांवाच्या नारळीसारख्या झाडाच्या अंगास येणारा कापसासारखा बुरा ; झाडांच्या सोपांत असणारी मऊ लोंकर ; याचा उपयोग रक्तस्त्राव बंद करण्याकडे व विस्तव पेटविण्याकडे करतात , कापूस कर्नाटकांत चिलीम पेटविण्यासाठी याचा उपयोग करतात . ' कपाचे नळकंडे बाहेर काढलें आणि ठिणगी काढण्यासाठीं पोलाद आणी गार काढली .' - कोरकी २९५ . पु. शर्टच्या अस्तनीच्या शेवटास असलेली पट्टी ( इं . कफ ; तुल० अर . कफ = हात ) स्त्री. ( यंत्र ) ( इं .) कॅप . टोपी ; झांकण ; सायकलच्या चाकांतील ट्युबमध्यें हवा भरावयाच्या नळीवरील टोपण , किंवा अँक्सल वगैरेवरील झांकण ; सायकल , मोटार , तांगा , वगैरेच्या चाकाच्या तुंब्यावरील टोपण . ( इं . कॅप .) स्त्री. नदीचा किम्वा विहिरीचा आंत गेलेला भाग ; कपी ; दरड ; कपार पहा . ( सं . कल्प ; प्रा . कप्प = विवर , गुहा ; का . कप्पु = जमिनींतील खड्डा , बीळ ) पु. १ पेला ; चहा पिण्याचें पात्र . ' सुशीलेनें चहाची केटली आणली होती ती हातांत घेऊन कपांत चहा ओतण्यापूर्वी त्याकडे पाहून विचारलें ...' - सुदे ११० . २ पेलाभर पातळ पदार्थ . ( दूध , चहा इ० ) ' संगल कप , ' ' डबल कप ' ०बशी चहाचा पेला व तो ठेवावयाची ताटली . ' आमची मातापितरे मुल जन्मलें कीं त्याच्या तोंडांत कपबशा खुपसतात . ' ( इं . कप ) ०तयार माण ) चकमकीनें विस्तव पाडण्यासाठी सुरमाडाचा , पाणसराच्या कणसाचा किंवा शेवरीचा कापूस तयार करणें . ( सं . कार्पास ; प्रा . कप्पास ; हिं . कपास ) करणे माण ) चकमकीनें विस्तव पाडण्यासाठी सुरमाडाचा , पाणसराच्या कणसाचा किंवा शेवरीचा कापूस तयार करणें . ( सं . कार्पास ; प्रा . कप्पास ; हिं . कपास )
|