Dictionaries | References ओ ओवाळणें Script: Devanagari Meaning Related Words ओवाळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t To wave (a platter containing lighted wicks, &c.) around the head of a person or an idol. To wave around in offering or consecrating, to consecrate. तन मन धन यर्थाथ। रामावरुनि ओंवाळिती॥. ओवाळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. लामणदिवा घेऊन किंवा तबकांत निरांजन , पैसा , सुपारी , अक्षता घालून तें माणसाच्या अगर देवाच्या तोंडाभोंवती उजवीकडुन डावीकडे फिरविणें ( अमंगल , इडापिडा जाण्यासाठी , पूजेच्या वेळीं , अगर मंगलप्रसंगीं ). स्त्रियांचें न्हाणें किंवा पुरुषांची आंघोळ झाल्यावर त्यांची वडील माणसे शेवटचा तांब्या घालून मग पुरुष असल्यास उदंड आयुष्याचा हो , मुलगी असल्यास चांगला पति मिळो व सुवासिनी असल्यास जन्मसावित्री - पुत्रवंती हो असे आशीर्वाद देऊन हातांत पाणी घेऊन स्नान करणार्याच्या अंगाभोंवती फिरवितात तें भोंवती ओंवाळून टाकणें ; क ; पदार्थ माणणें ; बलि देणें . ' तन मन धन ओंवाळून टाकणें ; कःपदार्थ मानणें ; बलि देणें . ' तन मन धन यथार्थ । रामावरुनि ओंवाळिती ॥ ' इऐं ते ओवाळोनि अखतां । दावावियां वसंतां । ' - शिशु ८१७ . ( सं . उद्वलन किंवा अवज्वलन ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP