Dictionaries | References

ओट्यांत रोट्या, काष्टांत तुराट्या

   
Script: Devanagari

ओट्यांत रोट्या, काष्टांत तुराट्या

   १. काबाडकष्ट करून, शेती करून उपजीविका करणार्‍या लोकांस पुरती भाकरी खाण्यासहि वेळ नसतो, याकरितां ओटीत भाकरी घेऊन ती एकीकडे काम करीत असतांच खावी लागते व एकीकडे कपड्यामध्ये केर कचरा वगैरे जात असतो व तूर कापून राहिलेले ठोंब वगैरे वस्त्रास टोचत असतात. अशी गरीब शेतकर्‍यांची अवस्था असते. २. तुराट्या (तुरीच्या काट्या) विस्तव पेटविण्यास उपयोगी पडतात. इतकी विपन्नावस्था की अन्न ओटींत (अंगावरच्या वस्त्रांत) व इंधन कमरेशी बाळगावें लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP