Dictionaries | References

एक मारी उंडे, एक मारी मांडे

   
Script: Devanagari

एक मारी उंडे, एक मारी मांडे     

उंडे हे तांदूळ आणि उडीद यांच्या पिठाचे ‘केक’ प्रमाणें तयार केलेला एक पदार्थ असून गोव्यांत, कर्नाटकांत सकाळी पावाप्रमाणें खातात. हा पदार्थ जड असतो. मांडे के कणकेचे फार पातळ पापदर्‍या असलेले पोळ्यांसारखे तयार केलेले असतात. एखाद्याकडे उंडा फेकला तर तो त्याला लागल्यास उंडा फुटणार नाही व लागणार्‍यास काही तरी इजा करील. पण मांडा फेकल्यास त्याचा चुरा होऊन जाईल व ज्याकडे फेकला त्यास नीट लागणारहि नाही. याकरितां एखाद्याने आपणाकडे उंडा फेकला तर त्याचा प्रतिकार मांडा फेकून करण्यापेक्षां धोंडा फेकून पाहिजे तर करावा
मांडा फेकून काही होणार नाही. एखाद्याने आपणास अपकार केल्यास त्याचा योग्य मार्गाने प्रतिकार करावा
उगाच काही तरी दुर्बल अनुकरण करूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP