Dictionaries | References

इरेस घालणें

   
Script: Devanagari

इरेस घालणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
To sacrifice one in order to save another.

इरेस घालणें     

बुद्धिबळाच्या खेळांत राजास शह लागूं नये म्हणून मध्ये दुसरे मोहरे किंवा एखादे प्यादें घालतात
अशा रीतीने राजास बचावतात. तसेच किल्ल्याचा दरवाजा धडकीने फोडूं जाणार्‍या हत्तीला दरवाजाचे खिळे लागूं नये म्हणून मध्ये उंट घालीत. यावरून १. एखाद्यावरचे संकट टाळण्यासाठी दुसर्‍याला बळी देणें. २. स्वतःच्या बचावासाठी दुसर्‍यास पुढे करणें. ३. भरीस घालणें
प्रोत्साहन देणें
उत्तेजन देणें
एखाद्या मनुष्याचा क्रोध, मत्सर, पराक्रम वगैरे जागृत करून त्यास एखादे काम करण्यासाठी प्रवृत्त करणें. ‘मल्हारराव यांनी इरेस घातले.’ -भाब १४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP