Dictionaries | References

आंबा फुलला तर बिचारा खालीं वांकतो

   
Script: Devanagari

आंबा फुलला तर बिचारा खालीं वांकतो     

आंब्यावर मोहोर आला तर त्या भाराने तो नम्र होतो. तसे सज्जन वैभवास चढले तर ते उद्दाम न होतां त्यांच्या ठिकाणी अधिक विनय दिसून येतो. उलट दुर्जनांच्या हाती थोडी फार सत्ता अगर संपत्ति आली तर ते मदोन्मत्त होतात. तु०-(अ.) नभ्र होती फलभारे तरुवर सारे.(आ.) भवन्ति नम्रास्तरवः फलोद्रमैर्नवांबुभिर्भूरिविलंबिनो घनाः। अनुद्धताः सत्पुरुषाः समृद्धिभिः स्वभाव एवैष परोपकारिणाम्।।-नीति ६१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP