Dictionaries | References अ अवल Script: Devanagari Meaning Related Words अवल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 At first; at the beginning. 2 Used as adj First, chief, greatest, highest. 3 Used as s f The first or earlier part. Ex. पावसानें अ0 साधली अखेरी घालविली. अवल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad At first.a First, chief, greatest, highest. f The earlier part. अवल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. पहिला ; उत्तम ; प्रमुख .( ल . ) अतिशय - पया ७२ . मोठा ; उच्च .( गो . ) पूर्णपणें तयार झालेला ( नारळ ).पहिल्या प्रतीचा , दर्जाचा , ( जमीन , रेशीम वगैरे ) वर्गवारींत पहिला - सन १७८८ चा पहाणा खर्डा ( कासारीतर्फ कागद ). - क्रिवि . प्रथमत :; पहिल्यांदा ; प्रारंभीं ; आदौ . - स्त्री . पहिला किंवा आरंभींचा भाग . पावसानें अवल साधली , अखेरी घालविली . [ अर . अव्वल ; अव्वल , दूम , सीम = पहिला , दुसरा , तिसरा . )०अखेर आखर - क्रिवि . आरंभापासून अखेरपर्यंत ; अथपासून इतिपर्यंत ( नकारार्थी प्रयोगांत ) पूर्णपणें ; एकंदर ; समूळ ; बिलकूल ; अगदीं ; सर्वस्वीं . [ अर . अव्वल + आखिर = शेवट . ]०अखेरइस्तावा आखरइस्तावा - पु . नवीन जमीनीवर दरवर्षी वाढत जाणार्या करापैकीं पहिला .०अर्जी वि. ( कायदा ) मूळ फिर्याद ; तक्रार ; अर्ज .०आढावा पु. साल आरंभीं मागचें येणें - देणें समजण्यासाठीं मांडलेला जमाखर्च .०कार्कून पु. मुख्य कारकून ; फडणीस .०कोर्ट न. मूळ दावा किंवा फिर्यादीबद्दल ज्या कोर्टांत संपूर्ण चौकशीचें काम चालून निकाल मिळतो तें कोर्ट ; ( इं . ) ओरीजनल कोर्ट .०जप्ती स्त्री. ( इं . ) अटॅचमेंट बिफोर जज्मेंट ; दाव्याचा निर्णय होण्यापूर्वी मिळकत कोर्टाच्या ताब्यांत घेणें .०पुरावा पु. ( इं . ) प्रायमरी एव्हिडन्स ; पहिल्या प्रतीचा पुरावा ; कोर्टानें समक्ष पहावा म्हणून मूर्तिमंत हजर केलेला दस्तऐवज .०रजिस्टर न. आजमितीस दरएक गांवांतील जमीनी कोणाकोणाकडे कोणत्या हक्कानें वहिवाटीस आहेत त्यांचें तपशीलवार नोंदपत्रक .०दोड द्वाड - वि . वाईटपणांत , द्वाडपणांत अग्रगण्य ; बिलंदर ; अट्टल ; पक्का .०साल न. वर्षाचा आरंभीचा भाग .विवक्षित संख्येंतील - मालिकेंतील पहिलें वर्ष .हिशोबाच्या सालांतील पहिलें साल .सुहुर एका वर्षाच्या काळांत ज्येष्ठांतील ( वैशाखांतील सुध्दां ) कांहीं मित्या दोन वेळां येतात यामुळें त्यांच्या निर्देशांतील संदिग्धता घालविण्यास अवलसाल अखेरसाल हे शब्द योजतात . ज्येष्ठ शुध्द ४ घटी ५ अवलसालीं राजश्रीची मुंज जाहली - शिचप्र २७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP