Dictionaries | References

अरुता

   
Script: Devanagari
See also:  अरता , अरती , अरतें , अरु , अरूता

अरुता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; indispensableness. Ex. मी आतां गेलों असतों पण दा- दाची अ0 आहे; कुळाची अ0 न घरतां जामीनदार खुद निसबत रुपये देईल. v धर or ठेव g. of o.

अरुता     

क्रि.वि.  इकडे ; अलीकडे ; अरता पहा . तो बुध्दियोग विवरितां । बहुतें पाडें पार्था । दिसे हा अरुता । कर्मयोगु । - ज्ञा २ . २७४ . तें अरुतेंचि ठेलें । - दाव १९४ . [ सं . आर + तस ]
 स्त्री. 
क्रि.वि.  अलीकडे ; इकडे ; येथें ; ह्या बाजूला , भागाला . याच्या उलट परता . देव सारावे परते । संत पुजावे अरते । तो गांव नदीचे अरता आहे . ( ल . ) अधिक प्रिय किंवा आवडता . मला लेंक अरता आणि पुतण्या परता , असें नाहीं दोघे सारखेच . [ सं . आर = सान्निध्य + तस ].
हक्क , जागा ; योग्यता ; योग्य स्थान किंवा धंदा , उद्योग .
०परता   क्रिवि .
अलीकडे पलीकडे ; इकडे तिकडे ; दोन्ही बाजूला ; सर्व बाजूंनीं ; सभोंवार .
पूर्ण आवश्यकता - जरुरी ( हजेरीची , मताची , येण्याची ); अपरिहार्यता ; अगत्य . त्याच्यापुढें बोलण्याची कांहीं अरुता नाहीं . - ख ३२०३ . ( क्रि० धर ; ठेव ) मी आतां गेलों असतों पण दादाची अरुता आहे . कुळाची अरुता न धरतां जामीनदार खुद्द रुपये देईल . [ सं . अर्हता ]
तेथेंच ; आगेंमागें ; जवळ ; आसपास ; कमीअधिक ; लवकर किंवा उशीरां . - वि .
इकडचा तिकडचा या बाजूचा त्या बाजूचा ; दोहींकडील ; एकाच विवक्षित सदराखालीं न येणारें . उ० अरतीपरती मिळकत ; जादा आड मिळकत .
क्षुद्र ; किरकोळ ; अवांतर ; सटरफटर . मी एकच चाकरी करीन अरतें परतें कांहीं करणार नाहीं .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP