Dictionaries | References अ अठरा नखी खेटरें राखी, वीस नखी घर राखी Script: Devanagari Meaning Related Words अठरा नखी खेटरें राखी, वीस नखी घर राखी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुत्र्यास अठरा नखें असतातत्याच्या मागच्या पायांस मागील नखें नसतात. मांजरास वीस नखें असतात. कुत्र्यास नेहमीं घराबाहेर पायतणें ठेवतात तेथें बसावयाला लावतात. त्यास घरांत शिरुं देत नाहींत कारण त्यास अपवित्र मानण्यांत येतें. मांजरास सर्व घरभर फिरण्याची मोकळीक असते व तें उंदरांपासून घरांतील पदार्थाची राखण करतें.कांहीं कुत्र्यांस अठरा व कांहींस वीस नखें असतात अशी समजूत आहे व अशावेळीं अठरा नखी कुत्रें अशुभ व वीस नखी शुभ मानतात.अठरा नखी हें कुत्रें व वीस नखी म्हणजे स्त्री असें समजून स्त्री ही घराचें रक्षण करते व कुत्रें जोड्यांजवळ बसत असेंहि मानतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP