Dictionaries | References

२०

   { वीस }
Script: Devanagari

२०     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बीस, बीस

२०     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वीस, वीस, वीस

२०     

Sanket Kosh | Marathi  Marathi
वीस अक्षरी मंत्र   
मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्रधर्म वाढवावा ॥ हा महाराष्ट्राचा संघटना मंत्र. (श्रीसमर्थ)
वीस धर्मशास्त्रप्रवर्तक   
१ मनु, २ अत्रि, ३ विष्णु, ४ हारीत, ५ याज्ञवल्क्य, ६ उशना, ७ अंगिरा, ८ यम, ९ आपस्तंब, १० संवर्त, ११ कात्यायन, १२ बृहस्पति, १३ पराशर, १४ व्यास, १५ शंख, १६ लिखित, १७ दक्ष, १८ गौतम, १९ शतातप आणि २० वसिष्ठ.
हे धर्मशास्त्रकर्ते होत.
"शतातपो वसिष्ठश्च धर्मशास्त्रप्रयोजकाः"। (स्मृति)
वीस स्मृति ग्रंथ   
प्राचीन ऋषींनीं केलेले धर्मशास्त्रविवेचक असे अनेक स्मृतिग्रंथ होत. १ मनु, २ याज्ञवल्क्य, ३ बृहस्पति, ४ विष्णु, ५ वसिष्ठ, ६ गौतम, ७ व्यास, ८ बौधायन, ९ शंख व लिखित, १० अत्रि, ११ हारीत, १२ उशना, १३ अंगिरा, १४ यम, १५ आपस्तंब, १६ संवर्त, १७ कात्यायन, १८ पराशर, १९ द्क्ष व २० शतातप स्मृति.
वीस उपस्मृतिकार   
१ अंगिरस, २ अत्रि, ३ आपस्तंब, ४ औशनस, ५ गोभिल, ६ पक्ष, ७ देवल, ८ प्रजापति, ९ वृहस्पति, १० यम, ११ विष्णु, १२ शंख, १३ शतातप, १४ हारीत, १५ अश्वलायन, १६ लिखित, १७ वसिष्ठ, १८ व्यास, १९ संवर्त आणि २० बौधायन. (स्मृतिसमुच्चय)
वीस कुलें वनस्पतींचीं   
१ सीताफळ, २ मोहरी, ३ कार्पास, ४ नारंग, ५ शिंबा, ६ गुलाब, ७ जंबू, ८ कूष्मांड, ९ कुसुम, १० जाती, ११ करवीर, १२ धत्तुर, १३ तुलसी, १४ औदुंबर, १५ एरंड, १६ नारिकेल, १७ कुमारी, १८ कदली, १९ नागदन आणि २० तृणधान्य कुल,
वीस भाव अथवा विकार सर्व भूतांचे ठायीं असलेले   
१ बुद्धि, २ ज्ञान, ३ असंमोह, ४ क्षमा, ५ सत्य, ६ दम, ७ शम, ८ मुख, ९ दुःख, १० भव, ११ अभाव, १२ भय, १३ अभय, १४ अहिंसा, १५ समता, १६ संतोष, १७ तप, १८ दान १९ यशं आणि २० अपयश ([भ. गी. १०-४५])
वीस लक्षणें समर्थसांप्रदायाचीं   
१ लेखन, २ वाचन, ३ अर्थांतर सांगणें, ४ आशंका निवृत्ति, ५ प्रचीति, ६ गायन, ७ नर्तन, ८ टाळीं वाजविणें, ९ अर्थभेद, १० प्रबंध, ११ प्रबोध, १२ वैराग्य, १३ विवेक, १४ लोक राजी राखणें, १५ राजकारण, १६ अव्यग्रता, १७ प्रंसग जाणणें, १८ वृत्ति उदासीन, १९ समता व २० राम उपासना (श्री समर्थांचा गाथा)
वीस उपभोगाचे विषय   
१ घर (वास्तु), २ स्त्रान, ३ पादपीठ, ४ ताम्बूल, ५ विलेपनउटी, ६ वस्त्र, ७ पुष्प, ८ अलंकार, ९ आसन, १० पंखा, ११ सभास्थान, १२ पुत्र, १३ अन्न, १४ पेय पदार्थ, १५ पादप्रक्षालन, १६ यान - वाहन, १७ छत्र, १८ शय्या, १९ सुगंधी धूप, आणि २० स्त्री. (अभिलषितार्थ चिन्तामणि, भाग १ ला)

२०     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : बीस

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP