|
न. न. पु. एका प्रांताचे नांव . [ सं . वराट ; सं . विदर्भ - वरदातट ; प्रा . वराड ] वर्हाडी - वि . या प्रांताचा , प्रांतासंबंधी . लग्न . सप्त वर्षे जाती तत्वतां । चिंतित होती मातातिता । वर्हाड केवी करावे । - गुच ३५ . १२० . - जगन्नाथ , शके १६६९ ग्रंथमाला . जनावराने सकाळच्या प्रहरी उकिरडा फुंकत फिरणे ; इरड करणे . ( ल . ) व्यसनीपणाचा क्रम . [ विरड ] वर्हाडी - वि . इरड करणारा ( बैल , गाय ). लग्नाची मिरवणूक . ( क्रि० काढणे ; चालणे ). लग्नास जमलेली मंडळी , समुदाय . ( क्रि० काढणे ; चालणे ). लग्नास जमलेली मंडळी , समुदाय . ( क्रि० निघणे ; चालणे ; जमणे ; उतरणे ; मिळणे ). वर नसता व्यर्थ वर्हाड । शीर नसतां कायसे धड । - रावि १ . ४४ . ( ल . ) मुंग्या इ० चा क्रमाने चालत असलेला समुदाय ; मुंग्यांची रांग . [ सं . वर + हाट ; किंवा वर + आड ] म्ह० वर्हाडास घोडे गेले तरी त्यास करड . = दुर्दैवी प्राण्यास सर्वच ठिकाणी हाल . ०गोष्टी स्त्री. अव . लग्नासंबंधीच्या गोष्टी , गप्पा , हकीकती . पोकळ प्रेमाच्या , सेवेच्या गोष्टी , बढाया . ०घर न. लग्नघर ; वर्हाड उरतलेले घर . ०ढक्का पु. लग्नावरचा कर . वर्हाडणी डिणी स्त्री . अव . लग्नासाठी जमलेल्या स्त्रिया . ( एव . वर्हाडीण ). नेटका वर्हाडी पुढे चालला । वर्हाडणी हांसती सकळा । - ह २४ . १०८ . वर्हाडणे अक्रि . विवाहसंस्कारविशिष्ट होणे ; लग्न होणे ( नवरानवरीचे ). विवाहसमारंभात वर्हाडी लोकांनी निमग्न होऊन जाणे . ( ल . ) मेजवानींत , आनंदाच्य गोष्टीत अगदी तल्लीन होऊण जाणे . वर्हाडीक - पु . बोलावणे ; आमंत्रण . पै परिसतु आहासि निकियापरी । तेंचि वक्तृत्वा वर्हाडीक करी । - ज्ञा ९ . २३८ . वर्हाडीक - का - स्त्री . सोयरीक ; लग्नसंबंध . तयेने बोधिला अनिरुद्ध । म्हणे आतां करुं संबंध । वर्हाडिकेचा । - कथा १ . ६ . ११४ . तयासी वर्हाडिका जालि । - पंच ४ . ६ . वर्हाडी - वि . वर्हाडांतील , वर्हाडाकडला ( पाहुणा , नोकर , वस्त्रपात्र इ० ). सीतासैंवराच्या काजा । सिद्धलाडु गणराजा । पूर्णमोदक पंचखाजा । तूं वर्हाडी आधी । - वेसीस्व १ . ३ . - ह २४ . १०८ . बर्हाड पहा . वर्हाडीण - स्त्री . लग्नासाठी आलेली स्त्री . वर्हाडणी पहा .
|