Dictionaries | References

लावणी

A dictionary, Marathi and English | mr  en |   | 
lāvaṇī f Verbal of लावणें q.v. 2 The setting of a field or plantation; the operations of setting and sowing: also the bringing of lands under cultivation. 3 A ballad or song of a particular kind; esp. sung by women. लावणीचा That was originally planted or set: as opp. to wild or spontaneously growing.

 स्त्री. 
 स्त्री. 
एक प्रकारची कविता , गाणे , चीज . ही खास महाराष्ट्रीय आहे . हींत शृंगार , वैराग्य वगैरे विषय दृष्टीस पडतात . लावणी बहुधा पहाडी , काफी वगैरे रागांत गाईलेली ऐकूं येते . [ लावणे ]
लागवडीचे व पेरणीचे काम ; लावण्याचा व्यापार ( रोपें , ढाळ्या इ० जमिनीत ). गुडघ्यावेरी चिखल जाहला आतां करुं लावणी । संपवूं काम गीत गाऊनी ।
जमीन पिकायोग्य करणे ; वहीत करणे .
०बाज वि.  
गणना ; संख्या . या निरुपणाचेनि नांवे । अध्यायपद सोळावे । लावणी पाहता जाणावे । मागिला वरी । - ज्ञा १६ . ६३ .
लावण्या म्हणणारा .
( ल . ) तमासगीर .
स्थापना ; मांडणी . ऐसी देतां उलठणी । अनुराग रोपाची लावणी । - शिशु ६८१ .
( गो . ) रतीब . दूधाची लावणी दुसरीकडे लावुंक जाय ( दुधाचा रतीब दुसरीकडे लावला पाहिजे ).
जडवणूक ; शृंगार ; आरास . अवघी जडिताची लावणी । - ऐपो १५ . [ सं . लापन ? ] ( वाप्र . )
०लावणे   क्रि .
तुलना करणे . कृष्णागरु आणि मलयानिल । लावणी लावितां मोल तुटे । - भवि २ . २४ .
व्यवहारी उपयोग करणे . वर्तल्यावीण शिकवी । ब्रह्मज्ञान लावणी लावी । - दा २ . १० . ३६ . सामाशब्द -
०अळपणी  स्त्री. ( व्यापकार्थी ) पेरणीमळणी ; अव्वल ते अखेरपर्यंतचे सर्व शेतकाम .
०उगवणी  स्त्री. शेतपेरणी , सारा वसुली इ० .
०कमज्यास्ती   - न . लागवडीसंबंधाचे कच्चे टिपण . विशिष्ट काळांतील पडीत - वहीत जमीनीचा हिशोब .
टिपण   - न . लागवडीसंबंधाचे कच्चे टिपण . विशिष्ट काळांतील पडीत - वहीत जमीनीचा हिशोब .
०जुंपणी   
नांगरणी , जुंपणी इ० ; लागवडीची कामे सर्व मिळून किंवा निरनिराळी . आमची लावणीजुंपणी आटपली - उरकली - संपली - अगदी बुडाली - बरी पिकली . लावणीजुंपणी मला कांही येत नाही .
जडविणे ; स्थापणे ; जुंपणे ; मार्गाला लावणे ; सांखळीत बसविणे .
०टुपणी  स्त्री. ( व्यापकार्थी ) सर्व शेतकाम ; कृषिकर्म ; लागवड . परगणे मजकुराची लावणीटुपणी उत्तम प्रकारे करुन ... - वाडबाबा १ . ८४ . [ लावणी द्वि . ]
०पत्रक  न. लागवडीखाली आणलेल्या ( वहीत ) जमीनीचा तक्ता ; गांवची खातेवारी वही . [ लावणी + पत्रक ]
०मांडणी  स्त्री. ( व्यापकार्थी ) लागवण ; लागवडीला आणणे . [ लावणे + मांडणे ]
०संचणी   लावणीटुकणी पहा . आपल्या तालुक्याची लावणीसंचणी करुन सुखरुप राहणे . - वाडबाबा १ . १५७ . लावणीचा वि . आपल्या आपण झालेले नव्हे ; लावणी करुन केलेले ( वृक्षादि ). लावणीचा ऊंस काय माय प्रकाश वर्णावया - वसा २६ .

Aryabhushan School Dictionary | mr  en |   | 
 f  A plantation. A kind of ballad or song.

Keyword Pages

  |  
  |  

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP