Dictionaries | References

बोंब

   
Script: Devanagari
See also:  बोंम

बोंब

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

बोंब

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The cry uttered by bellowing and beating the mouth with the hand, outcry.
बोंब पडणें-बाजणें-होणें.   Be exceedingly and distressingly scarce.

बोंब

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  तोंडावर हात मारत जोराने केलेला आवाज   Ex. मुलांच्या बोंबा बाहेरपर्यंत ऐकू येत होत्या.

बोंब

  स्त्री. 
   ( नाविक ) नाळेवरचें शीड .
  पु. बंब्या पहा पोत्यांतील धान्य नमुन्यासाठीं काढावयाचें हत्यार .
  पु. ( गो . ) बोम ; लहान मुलास दुध पाजण्याचें कांचेचें भांडें . [ पोर्तु . एंबिगो ]
   नाळेवरील लहान शीड लावण्यासाठीं असलेलें लांकूड ; नाळेवरील डोलकाठी .
   तोंडावर हात मारीत मारीत काढलेला मोठा आवाज ; शंखध्वनि ( अति दुःख , महत्संकट , तक्रार किंवा शिमगा यावेळीं केलेला ). ( क्रि० मारणें ; ठोकणें ).
   हाकाटी ; दुर्भिक्ष . यंदा पाण्याची फार बोंब उडाली .
०पाटली  स्त्री. ( नाविक ) दाट्यावर लांकडी बोंब अडकविण्यासाठीं एक आडें ठोकतात तें . याच्या मध्यावर खालच्या अंगास खांचा ठेवितात , कारण बोंब व आढें यांस बांधणारी दोरी या खांचेंतून भरुन घेतात .
०बाटली   हांजा - स्त्रीपु . नाळीवरचें शीड वर करण्याची दोरी .
   पुकारा ; गलबला ; ओरडा . [ देप्रा . बुंबा ध्व . बं ] म्ह० ( राजा ) मृगाआधीं पेरावें व बोंबेआधीं पळावें .
०उठणें   
   बोंब लागणें पहा .
   भुमका उठणें ; जाहीर होणें .
०पडणें   वाजणें होणें -
   ओरडा होणें ; हाकाटी होणें ; न मिळाल्यामुळें बोभाटा होणें .
   अत्यंत प्रयासानें मिळणें ; दुर्भिक्ष होणें . ( कोणेकाच्या नांवाची )
०पडणें   एखादें दुष्कर्म अमक्यानें केलें असा बोभाटा होणें .
०पाडणें   ( ना . ) ( उपरोधिक ) शतकृत्य करणें ; दिग्विजय करणें ; दिवे लावणें .
०लागणें   कळ उठणें ; वेदना होणें ; बोंब उठणें ; वेदनांनीं ओरडण्याइतकें दुःख होणें . एखाद्याच्या नांवानें बोंब मारणें , बोंब मारणें एखादी वाईट गोष्ट अमक्यानें केली असें सांगत सुटणें . काय बोंब मारली ( व . ) कोणती कर्तबगारी केली ? बोंबलणें अक्रि .
   बोंब मारणें ; बोंब ठोकणें .
   ( एखादें कार्य किंवा मसलत ) फसणें ; शेवटास किंवा पूर्णत्वास न जातां मध्येंच निःशेष होणें ; कांहींएक निष्पन्न न होणें .
   ( व . ) टेंभलणें ; मोठ्यानें रडणें . बोंबलता - वि . बोंबलणारा ; बोंब मारणारा . म्ह० रडत्याची शेती बोंबलत्याचें दुभतें . बोंबलपट्टी - स्त्री .
   मोठा आरडाओरडा ; हाकाटी ; गलबला .
   स्वतःची फुशारकी ; आत्मस्तुति ; आत्मश्लाघा . बोंबल बाराखडी - स्त्री . अंगीं मुळींच विद्वत्ता नसून पांडित्याची ऐट दाखविणें . बोंबलभिक्या - वि . कपाळकरंटा ; कमनशिबी ; दुर्दैवी . [ बोंबलणें + भीक ] बोंबल्या - वि .
   नेहमीं वोंबलण्याची किंवा आरडाओरड करण्याची संवय असलेला ; बोंबलणारा .
   नेहमीं फुरफुरणारा ( घोडा ). म्ह० ( व . ) येरे माझ्या मागल्या पाप न जाई बोंबल्या . बोंबल्या गणेश , हणमंत - पु .
   वाचाळ , वटवट्या , तोंडाळ इसम .
   गुप्त गोष्ट मनांत न ठेवणारा मनुष्य .
   नेहमीं अमंगळ बोलणारा , अभद्रभाषी , रड्या माणूस . [ बोंबलणें + गणेश - हणमंत ] बोंबळी - स्त्री . बोंब . - शर . बोंबाबोंब - स्त्री . भयंकर हाकाटी ; आरडाओरड ( अनर्था मुळीं झालेली ). कां मग बोंबाबोंब । - टिळक . [ बोंब द्वि . ] बोंबाळ - पु . गोंधळ ; धांदल ; दंगलधुमाकूळ ; गडबड ; धामधूम ( मेजवानी इ० मध्यें ). म्ह० गावांत लगीन कुत्र्याला बोंबाळ . बोंबाळणें - उक्रि .
   गोंधळांत सांपडणें ; त्रासांत अडकणें ; गोंधळून जाणें ; गडबडून जाणें .
   गोंधळ करणें ; गडबड उडवून देणें ; गोंधळांत पाडणें ; त्रास देणें . बोंबो - वि . ( गो . ) वेडा ; मूर्ख . बोंब्या - पु .
   गयेमधील एक पंड्या ; हा यात्रेकरु आले म्हणजे त्यांच्या पुढें बोंब मारीत जातो .
   हाकारा करणारा नोकर . त्यांत बोंब्या निघून गेला । - ऐपो ५२ .
   ( थोड्याशा दुखापतीमुळें किंवा भीतीमुळें ) मोठी ओरड करणारा ; बोंबलणारा .
   काम फत्ते करुन न येणारा ( एक शिवी )

Related Words

बोंब   बोंब उठणें   बोंब उडोवपी   बोंब ठोकणें   बोंब घालपी   एखाद्याच्या नांवानें बोंब मारणें   आग लाव्या आणि बोंब मार्‍या   बोंब माल्ली म्हूण स्वर्गाद पावना   होळीची बोंब तीन चार दिवस   बोंब पडणें   बोंब पाडणें   बोंब लागणें   बोंब वाजणें   बोंब होणें   हांक बोंब   ಬಾಂಬು ಹಾಕುವ   काय बोंब मारली!   उंसाचा कोंब, खाण्याची बोंब   कोणेकाच्या नांवाची बोंब पडणें   कोतवाला आधी चोरा बोंब   घर जळल्‍यावर बोंब मारणें   शिमग्याच्या आधींच बोंब   गावुं मारि, बोंब करि   बोंब मारु वाद   मालकाचे आधीं चोराची बोंब   नांवाची बोंब पडणें   नांवानें बोंब मारणें   हांक ना बोंब !   बमा बेरफुहेग्रा   குண்டு வீசக்கூடிய   بمبٲری کرن وٲلۍ   బాంబులు విసిరేవాడు   ബോബ് വർഷിക്കുന്ന   एकीकडे आरडाओरड नि दुसरीकडे बोंब   अडजीभ खाती पडजीभ बोंब मारती   गळ्यांत गरसोळी आणि गांवांत बोंब   बोंब रावणाची आणि करणी करटाची   मुकी मारली, हांक ना बोंब   मुकीला हेपललें, हांक ना बोंब   मुक्याला लुटलें, हांक ना बोंब   पाप बोंब देऊन मारुन उठणें   बॉम्बफेकी   بمبار   বোমারু   ਬਮਬਾਜ   ବୋମାବର୍ଷୀ   तेल्‍याचो बैल मेलो, बोंब मार बामणा   चावडीबाहेर (वर) बोंब मारायला पाटलाची परवानगी नको   બોમ્બર   चोराचा माल चोरीस गेला तर हाक ना बोंब   बमवर्षक   शिमग्याचा मंत्र   शंखध्वनी   बॉब   बोवाळणें   ब्वाम   बेंबारा   हुयल   कुय   बोंबति   फाल्गुन वाद्य   धमाको   हरि विठ्ठल   हुएल   आरोळी बोंबा ठोकणें   ओं ना बों, शेणाचा पोह   ओं म्हणतां बों येईना   तडकबोंब   मनगटावर चुना ओतणें   मनगटावर चुना घालणें   मनगटावर तेल ओतणें   मनगटावर तेल घालणें   घेतां दिपाळी, देतां शिमगा   शंखतीर्थ घेणें   त्वंपुरा   लाइस   पांचजन्य करणें   शंख करणें   शंखध्वनि   असेल त्या दिवशीं दिवाळी, नसेल त्या दिवशीं शिमगा   चिड्डाचिड्डी   बोंबलणे   बोंबाणें   बोबाणें   ठणठणाट   बोंम   कुलीली   कुलुली   अर्जुनवाद्य   लतारणी   महाशब्द   हाता तोंडाशीं गांठ पडणें   आहे ते दिवस ते दिवस दिवाळी नाही ते दिवस शिमगा   असल्या दिवशीं दिवाळी, नाही तेव्हां शिमगा   असेल त्या दिवशीं दिवाळी, नाही नसेल त्या दिवशीं शिमगा   ठणठणपाळ   ठो   बोम   धुमाकूळ घालप   कुलपी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP