Dictionaries | References

दीप जळे विघ्न पळे, पूण ज्याचें सरे त्यास कळे

   
Script: Devanagari

दीप जळे विघ्न पळे, पूण ज्याचें सरे त्यास कळे

   ( गो. ) बरें केल्यास बरें होतें पण तें करतांना भोगावा लागणारा त्रास, श्रम ज्याचे त्यालाच ठाऊक. [ एकदां एक मनुष्य एकाकडे पाहुणा गेला असतांना सायंकाळीं ओटीवर समई लावून ठेवण्यांत आली. तिच्या एका नाकांत वात तेवत होती. त्या पाहुण्यानें जवळची चिंधी फाडून सर्व नाकांत वाती घातल्या व पेटविल्या. यजमानानें असें करण्याचें कारण विचारतांच, ‘ दीप जळे विघ्न पळे ’ असें त्यानें उत्तर दिलें. तेव्हां यजमानानें प्रत्युत्तर केलें कीं, ‘ ज्याचें सरे त्यास कळे, ’ व सर्व वाती विझवून टाकल्या !] ज्याचें जळे त्याला कळे पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP