निरंजन माधव - नाममहिमा

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


रामा । त्वन्नगरी महोन्नत खरी नामें अयोध्यापुरी

सातांमाजि धुरी म्हणोनि पहिली आली गणाया तरी ।

जे शोभे शरयूतिरीं सुखकरी ध्यातां तितें अंतरीं

तोही मोक्ष वरी तुझा जप करी तैं काय आहे उरी ? ॥९२॥

जे तुझी करिती पुजा पुजिसी तूं, ते वंदितां वंदिसी

ध्यातां ध्यासिल सर्वदा निजजनां ठेवोनियां मानसीं ।

जैसे जे करिती तुझी सुखघना तैसाचि तूं वर्तसी

रामा ! तुज असा कृतप्रतिकृती लोकीं नसे चौदशीं ॥९३॥

रामा ! त्वन्नामगोडी निशिदिनीं जपतां एक शंभूचि जाणे

दोदेंडाच्या प्रतापा पुरहरधनुषें मापिलें सत्य जाणें ।

पादाब्जाच्या रजाचा मुनिवरवनिता जाणता हे अभावा

वाणाचा धाक चित्तीं जलनिधि अझुनी वाहतो साच देवा ॥९४॥

जेथें गोड फळें सुगंधसुमनें नाहींत जेथें सुमें

तेथें गोड फळे नसेति जगतीं आहेति वल्लीद्रुमें ।

तुझी नामलता सुपुण्यसुमनें मोक्षेंफळें भारली

रामा ! देखतसों त्रिलोकविपिनीं अत्यंत विस्तारलीं ॥९५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP