रामा ! तूं एकपत्नीव्रतधर ह्नणती लोक मी तें न मानी
हे तुझी कीर्तिकांता विलसत दुसरी ऐकतों नित्य कानीं ।
देवा ! नाना कळा त्या तुज वरुनि सुखें राहती तूजपाशीं
तुझ्या शक्ती अनंता ! असति गुणवती तूंचि मोठा विलासी ॥७९॥
लक्ष्मी सत्कीर्ति विद्या विरति सुजनता सुप्रभा शांति मैत्री
लज्जा भुतानुकंपा धृति मति विलसे नम्रता प्राणिमात्रीं ।
ऐशा नाना विभूती तव तनुभुवनीं नांदती तोषयुक्ता
श्रीरामा ! सार्वभौमा तव गुणगणनीं शारदाही अशक्ता ॥८०॥