मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय अठरावा|

एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


विप्रस्य वै संन्यसतो देवा दारादिरूपिणः ।

विघ्नान्कुर्वन्त्ययं ह्यस्मानाक्रम्य समियात्परम् ॥१४॥

संन्यास करिता जो ब्राह्मण । त्यासी समस्त देव मिळोन ।

नाना स्त्रियादि रूपें जाण । अनंत विघ्नें करूं येती ॥७०॥

विघ्न करावया कारण । मनुष्य देवांचा पशु जाण ।

सदा अर्पी बळिदान । देवाअधीन हा सर्वदा ॥७१॥

तो बळी नेदी येथूनि आतां । पाय देऊनि आमुचे माथां ।

घेऊं पाहे ब्राह्मसायुज्यता । यालागीं सर्वथा विघ्नें करिती ॥७२॥

तेथ वैराग्यबळें तत्त्वतां । विघ्नें हाणूनियां लातां ।

अवगणूनि देवां समस्तां । संन्यास सर्वथा करावा ॥७३॥

ऐसा वैराग्यें उद्‍भट । विवेकज्ञानें अतिश्रेष्ठ ।

संन्यासग्रहण वरिष्ठ । विधिनिष्ट विभागें ॥७४॥

एवं झाल्या संन्यासग्रहण । त्याचें विधीचें विधिविधान ।

स्वयें सांगताहे नारायण । स्वधर्मलक्षण संन्यासिया ॥७५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP