कन्दमूलफलैर्वन्यैर्मेध्यैर्वृत्तिं प्रकल्पयेत् ।
वसीत वल्कलं वासस्तृणपर्णाजिनानि च ॥२॥
वनींचीं कंदमूळफळें । जीं निपजलीं ऋतुकाळें ।
तींही अतिपवित्रें निर्मळें । आहार तेणें मेळें करावा ॥१७॥
वनवासीं वस्त्रें जाण । वल्कलें व्याघ्रमृगाजिन ।
अथवा नेसावें केवळ तृण । कां पर्णाभरण वृक्षांचें ॥१८॥
वानप्रस्थीं नेमग्रहण । ऐक त्याचेंही लक्षण ।
त्या नेमाचें निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥१९॥