मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|भोंडल्याची (हादग्याची) गाणी|
काळी चंद्रकळा नेसूं मी कश...

भोंडल्याची गाणी - काळी चंद्रकळा नेसूं मी कश...

नवरात्रात मुली आणि स्त्रिया एकत्र येऊन, हतीचे चित्र अथवा मुर्ती भोवती फेर धरून पारंपारिक गाणी म्हणतात,

Bhondala is the simple gathering of unmarried girls and/or young women during the late evening of Navaratri. They gather and sing the listed songs while holding hands and moving around an image of an elephant. This elephant, in center of gathering is a symbolic presence of Lord Ganesha.


काळी चंद्रकळा नेसूं मी कशी

गळ्यांत हार बाई वाकूं कशी

पायांत पैंजण चालूं कशी

बाहेर मामाजी बोलूं कशी

दमडीचं तेल मी आणूं कशी

दमडीचं तेल बाई आणलं

सासूबाईचं न्हाण झालं

वन्सबाईंची वेणी झाली

मामांजींची दाढी झाली

उरलेलं तेल झांकून ठेवलं

लांडोरीचा पाय लागला

येशीपातूर ओघळ गेला

त्यातन हत्ती वाहून गेला

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP