पानपुडा की शंकरचुडा की शंकरचूडा
मामा माझा की लेकुरवाळा की लेकुरवाळा
त्याच्या घरीं की दुभतं कांहीं की दुभतं कांहीं
मामा पाहुणा आला बाई की आला बाई
त्याला जेवायला काय काय करूं की काय काय करूं
त्याला जेवायला साखर उंडे की साखर उंडे
मामा सांगे की मामी भांडे की मामी भांडे
त्यानं आणली की तेलंग साडी की तेलंग साडी
नेसून गेलें मी बुरजावरी की बुरजावरी
तिथं हरपली इरुद्या जोडवीं की इरुद्या जोडवीं
सासूबांईना कळूं गेलं की कळूं गेलं
चार चाबूक चमकाविले की चमकावीले
ते बाई चाबूक दूरच्या दूर की दूरच्या दूर
माझं माहेर पंढरपूर की पंढरपूर
माझं आजोळ रत्नांगिरी की रत्नांगिरी
रत्नांगिरीच्या बांगड्या साध्या की बांगड्या साध्या
येतां जातांना खुळखुळ वाजे की खुळखुळ वाजे