मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ४|
करोनी पातक आलों मी शरण । ...

संत तुकाराम - करोनी पातक आलों मी शरण । ...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट नसलेले अप्रसिद्ध अभंग.


करोनी पातक आलों मी शरण । याचा अभिमान असों द्यावा ॥१॥

जैसा तैसा तरी असें तुझा दास । धरियेली कास भावबळें ॥२॥

अवघेचि दोष करुनि अन्याय । किती म्हणुनि काय सांगूं देवा ॥३॥

तुका म्हणे मी तों पतितचि खरा । परि आलों दातारा शरण तुज ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP