तुज हे समर्पिली काया । निजभावें पंढरिराया ।
सांभाळीं तूं विषम डाया । करुनी छाया कृपेची ॥१॥
चतुर तरी चतुरांचा रावो । जाणता तरी जीवांचा जीव ।
न्यून कोणी एक ठाव । आरुष भाव परि माझा ॥२॥
होतें तैसें माझें भांडवल । पायांपें निवेदिले बोल ।
आदरा ऐसें पाविजे मोल । तुका म्हणे फोल साच जाण ॥३॥