मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह ३|
आमुचे प्रणाम बाबांना ...

बालगीत - आमुचे प्रणाम बाबांना ...

महापुरुषांची चरित्रे स्फूर्तिदायक असतात. त्यांच्या उदात्‍त जीवनमूल्यांचे त्या चरित्रांतून आकलन होते. त्या विभूतींवरील कविता वाचून मनाला उभारी मिळते.


आमुचे प्रणाम बाबांना

त्या थोर पूज्य चरणांना !

दलितांचे झाले वाली

तिमिरात ज्योत लाविली

गरिबांस जाग आणिली

दिली एक नवी प्रेरणा

आमुचे प्रणाम बाबांना !

शिकविली नव्याने समता

’चवदार तळ्याची कथा’

हे ’जीवन’ सर्वांकरिता -

सांगती मंत्र दुबळ्यांना

आमुचे प्रणाम बाबांना !

व्हा जागे, मोठे व्हा रे

बंदिस्त ठोठवा दारे

अन्याय दूर सारा रे

तळमळीची ही घोषणा

आमुचे प्रणाम बाबांना !

ते शिकले, मोठे झाले

ते शिकवायाते झटले

बंधूंची म्हणुनी पावले

चालली करीत गर्जना -

’भीमराव, घ्या नजराणा’

आमुचे प्रणाम बाबांना !

N/A

References :

कवी - वि.म.कुलकर्णी

Last Updated : December 26, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP