मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह ३|
ते देशासाठी लढले ते अम...

बालगीत - ते देशासाठी लढले ते अम...

मायभूमी या विषयांवरील कविता मुलांमध्ये निष्‍ठेचे स्फुलिंग चेतवतात आणि राष्‍ट्राविषयी आपल्या जबाबदारीची जाणीव करुन देतात.


ते देशासाठी लढले

ते अमर हुतात्मे झाले !

सोडिले सर्व घरदार

त्यागिला मधुर संसार

ज्योतीसम जीवन जगले

ते देशासाठी लढले !

तो तुरुंग, ते उपवास

ते साखळदंड तनूस

कुणि फासावरती चढले

ते देशासाठी लढले !

झगडली-झुंजली जनता

मग स्वतंत्र झाली माता

हिमशिखरी ध्वज फडफडले

ते देशासाठी लढले !

कितिकांनि दिले प्राणास

हा विसरु नका इतिहास....

पलित्याची ज्वाला झाले

ते देशासाठी लढले !

हा राष्‍ट्रध्वज साक्षीला

करु आपण वंदन याला

जयगीत गाउया अपुले

ते देशासाठी लढले !

N/A

References :

कवी - वि.म.कुलकर्णी

Last Updated : December 26, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP