मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह ३|
उत्क्रांतीचा आज आम्हांला ...

बालगीत - उत्क्रांतीचा आज आम्हांला ...

मायभूमी या विषयांवरील कविता मुलांमध्ये निष्‍ठेचे स्फुलिंग चेतवतात आणि राष्‍ट्राविषयी आपल्या जबाबदारीची जाणीव करुन देतात.


उत्क्रांतीचा आज आम्हांला

देई नव संदेश

आमुचा महाराष्‍ट्र हा देश ॥

थोर आमुची मायमराठी

प्रेम देतसे सकलांसाठी

संतजनांच्या घेण्या भेटी

इथे येई परमेश

आमुचा महाराष्‍ट्र हा देश ॥

’जातपात’ हा विचार सोडुन

समानतेचा धागा जोडुन

मानवतेचा सदा आम्हांला

नित्य देई संदेश

आमुचा महाराष्‍ट्र हा देश ॥

कृतिशीलता इथले भूषण

नकोच आता केवळ भाषण

परस्परांचे नकोच शोषण

करी असा उपदेश

आमुचा महाराष्‍ट्र हा देश ॥

इथली व्यक्‍ती, इथले नायक

सत्य-शिवाचे व्हावे पाईक

श्रम-शौर्याची शर्थ कराया

मनास दे आवेश

आमुचा महाराष्‍ट्र हा देश ॥

N/A

References :

कवी - बजरंग सरोदे

Last Updated : December 26, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP