पसरलाय सागर दूरवर पहा
फुललाय निसर्ग न्याहळत रहा -
अबोली वस्त्रांचे डोंगर छान
माडांचं सळसळणं तृप्त कान -
सोन-नागचाफा कवठीचाफा अस्सा
सुरंगीचा गंध दरवळतो खासा -
चिंचोळे रस्ते तांबडी माती
चिर्यांची घरे टुमदार किती -
हिरवं स्वच्छ सारवलं अंगण
शोभे छान तुळशी वृंदावन -
आहे परसात नेटकी विहीर
माड, आंबा आलाय बहर -
हिरवा कोकण सहल न्यारी
आमचं काश्मीर पहा तरी -