पोवाडा - पेशवाईच्या त्रोटक हकीकतीचा पोवाडा

अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.

ह्या पोवाड्यात बहिरोपंत पिंगळे यांजकडील पेशवे हे पद निघून बाळाजी विध्वनाथ यास ते मिळणेबाजीराव बल्लाळ यांचे उत्तरहिंदुस्थानांतील पराक्रम, मस्तानीशी स्नेह, वसईचा वेढा व विजय

बाळाजी बाजीराव यांनी केलेली पुणे शहराची सुधारणा, विद्येला दिलेले उत्तेजन, त्यांचे स्वतःचे आणि राघोबादादा व सदाशिवरावभाऊ यांचे पराक्रम व शौर्य, आणि अखेरचे पानिपतचे अपयश व मृत्यु-वगैरे गोष्टींचा उल्लेख आहे.


श्रीमंत ईश्वरी अंश, धन्य तो वंश, परम पुरुषार्थी ।

बरोबरी तयांची कोण करील पहातार्थी ॥ध्रुवपद॥

राजाधिराज महाराज, गरीब नवाज, धनी श्रीमंत ।

भासती सदैव देव आमचे हेच भगवन्त ॥

पाषाण धातुच्या मूर्ती, धरत्रीवरती, आहेत अनंत ।

त्या पूज्य परंतु नाहीत प्रगट जीवित ॥

तसे नव्हेत हे तर देव, कलिमध्ये भूदेव, ब्राह्मण संत ।

त्या वंशी पेशवे झाले सबळ बळिवंत ॥चाल॥

योग्यतेस आणिले पंत, होऊनिया कृपावंत, त्या राजांनी ।

ह्यामुळेच चढती कमान, धरुनी अभिमान.... ।

मग बहिरोपंत सोडवून, बिडी तोडवून, प्रभुच्या पणज्यांनी ॥चाल पहिली॥

पुढे प्रधानपद मिळवून, वैरी पळवून मारिल्या शर्थी ॥श्रीमंत०॥१॥

राव बाजी पुण्यामध्ये येऊन, हातावर घेऊन, निघाले शीर ।

प्रारंभी पाहिले जनस्थान रघुवीर ।

नेमाड माळवा मुलूख, करुन सरसलूख, मोडिले वीर ।

मेवाडचे राजे न धरती धीर ॥

गढमंडळ बुंदेलखंड, डंघईत अखंड, राहून थंड, सही केले ।

प्रतापे करून या जगात नाग मिळविले ॥चाल॥

बुडवूनि या बहाद्दरास, आणिली घरास, माषुक मस्तानी ।

दरवर्षी धौंशा घालून, जावे चालून अघाडीस मस्तानी ॥

शह दिला नगर थेट पास, खु...... । ........॥चाल पहिली॥

उपरात नर्मदाकाठी, सार्थकासाठी, मोक्ष कार्यार्थी ।

देह समर्पिला त्या स्थानी याच भावार्थी ॥ श्रीमंत ॥२॥

तेची दुनियेमाजी धन्य, न मानी अन्य, वंदिती स्वामी ।

जीव खर्च कराया सिद्ध धन्याच्या कामी ॥

तीन वर्षे राज्य वसवून, मोर्चे बसवून सभोवते धमामी ।

सुरुंगानी पाडिला अलगत बुरुज बदामी ॥

हल्ल्यांत उडाले लोक, करिती किती शोक, पडून संग्रामी ।

नऊ लक्ष बांगडी फुटली वसई मुक्कामी ॥चाल॥

बक्षीस दिले कडी तोडे, पालख्या घोडे, वाजे चौघडे, जमीदार्‍या ।

ठायी ठायी दिसती भरभरून, आख ठरवून,

सजीवल्या सरदार्‍या परशत्रू होईना खाक, वाटुनी परख, तशाच हवलदार्‍या ॥चाल पहिली॥

खूब केली तुम्ही तरवार, नावनिशीवार, म्हणून किती प्रार्थी ।

यशस्वी होता तो संवत्सर सिद्धार्थी ॥श्रीमंत॥३॥

बाळाजी बाजीराव प्रधान, केवळ निधान, होते प्राणी ।

आणिले पुण्यात जपानी नळाचे पाणी ॥

युद्धात जिंकुन नबाब, बसविली बाब, करून धुळदाणी ।

त्या सालीच बंगाल्यत घातली ठाणी ॥चाल॥

लागलेच केले कूच, स्वारी दरकूच, परतली सगळ्यांची ।

लष्करात केवढा गजर, होई नित्य नजर, मोती मणि पोवळ्यांची ।

वाटून खिचडी रमण्यात, आनंदे पुण्यात, मोहरापुतळ्यांची ॥चाल पहिली॥

खुष केले शास्त्री पंडित, विद्यामंडित, विप्र विद्यार्थी ।

गेले कीर्त गात ते ब्राह्मण तीर्थोतीर्थी ॥श्रीमंत०॥४॥

शत्रूस न जाती शरण, आल्या जरी मरण, न देती पाठ ।

दादाही गणावा त्यात, बाण भात्यात, भातांचे ताट ॥

भलत्याच ठिकाणी घाली रिपुशी गाठ ।

तिन्ही काळ निरंतर साधी, जातीने बांधी, हत्यारे आठ ॥चाल॥

फेडून नवस, माहेरास, गेले लाहोरास, जिंकित शेंडे ।

अरे जपानी सहज अटकेत, पाव घटकेत, लाविले झेंडे ।

सरदार पदरचे कसे, कोणी सिंह जसे, कोणी शार्दूल गेंडे ॥चाल पहिली॥

पुढे चाले वीरांचा भार, घेती करभार, स्वामी कार्यार्थी ।

हे पुरुष म्हणावे श्रेष्ठ बंधुचे स्वार्थी॥श्रीमंत०॥५॥

भाऊसाहेब योद्धा थोर, आंगामध्ये जोर, पुरा धैर्याचा ।

विश्वासरावही तो तसाच शौर्याचा ॥

दोहो बाजूस भाला दाट, पलिटेना वाट, अशा पर्याचा ।

किंचित पडेना प्रकाश वर सूर्याचा ॥

दृष्टांत किती कवि भरील, काय स्तव करील, ऐश्वर्याचा ।

शेवटी बिघडला बेत सकळ कार्याचा ॥चाल॥

कितीकांची बसली घरेच, हे तर खरेच, ईश्वरी कृत्य ।

शोकार्णवी नाना पडून, नित्य रडरडून, पावले मृत्यु ।

कवि गंगु हैबती दीन, पदांबुजी लीन, कृपेतील भृत्य ॥चाल पहिली॥

महादेव प्रभाकर ध्यायी, सदा गुण गाई, यथा साह्यार्थी ।

श्रीमंत प्रभूची कीर्त जशी भागीरथी ॥श्रीमंत०॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP