पूर्वपूजा पंचोपचार
(देवीची मूर्ती पुसावी. ताम्हनातील पाणी तीर्थपात्रात काढून ठेवावे.)
१) (गंध लावावे.) -
श्रीमहा० विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
२) (फूल वाहावे.) -
श्रीमहा० पूजार्थे पुष्पं समर्पयामि ।
३) (धूप किंवा उदबत्ती, घंटानाद करीत ओवाळावी.)
श्रीमहा० धूपं समर्पयामि ।
४) (निरांजन, घंटानाद करीत ओवाळावे.)
श्रीमहा० दीपं समर्पयामि ।
५) (देवीला पंचामृताचा नैवेद्य दाखवावा - पाटावर पाण्याने लहानसा चौकोन करून त्यावर पंचामृताचे कचोळे ठेवावे. त्याभोवती उजव्या हाताने पाणि परिसिंचन करावे व नैवेद्यावरही फुलाने किंचित्त् पाणी शिंपडावे. प्राणाय स्वाहा । इत्यादि प्राणाहुती दोनदा म्हणाव्यात, उजव्या हाताने देवीला नैवेद्य भरवीत आहोत अशी क्रिया करावी.) -
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । पंचाम्रुतनैवेद्यं समर्पयामि ।
ऋतं त्वा सत्येन परिषिंचामि ।
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा ।
ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।
(एक एक पळी पाणी उजव्या हाताने ताम्हनात सोडावे.) -
उत्तरापोशनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि ।
(गंध फुलाने वाहावे) -
करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।
(विड्याच्या दोन पानांवर सुपारी व दक्षिणा ठेवावी. पळीभर पाणी तीवर सोडावे.)
श्रीमहा० मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामि । दक्षिणां समर्पयामि ॥
(गंधाक्षता पुष्प वाहावे.)
श्रीमहा० मंत्रपुष्पं समर्पयामि ।
(ताम्हनात उजव्या हाताने पळीभर पाणी सोडावे.)
अनेन पूर्वपूजनेन श्रीमहालक्ष्मीसरस्वत्यौ प्रीयताम् ॥
अभिषेक - लक्ष्मीची मूर्ती असेल तर ताम्हनात ठेवून पळी पळी पाण्याने अभिषेक करावा, तसबीर असेल तर फुलाने पाणी शिंपडीत असता श्रीसूक्त किंवा या पुस्तकात शेवटी दिलेली देवीची १०८ नावे म्हणावीत.
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । महाभिषेकस्नानं समर्पयामि ।
शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।
(अभिषेकानंतर गंधाक्षता व फूल वाहावे, नंतर नमस्कार करावा.)
सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं च समर्पयामि । नमस्करोमि ।
(ताम्हनातून देवीची मूर्ती काढून पुसून कलशावरील तबकात जागी ठेवावी.)
वस्त्रे (कलशाभोवती उपरणे गुंडाळावे व खण ठेवावा.) -
दिव्यांबरं नुतनं हि क्षौमं त्वतिमनोहरम् ।
दीयमानं मया देवि गृहाण जगदंबिके ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । वस्त्रयुग्मं समर्पयामि ।
आभूषणे (दागिने अर्पण करावेत.) -
रक्तकंकणवैदूर्य - मुक्ताहारादिकानि च ।
सुप्रसन्नेन मनसा दत्तानि स्वीकुरुष्व त्वम् ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । नानाविध - भुषणानि समर्पयामि ।
चंदन - (गंध लावावे.) -
श्रीखंडागुरुकर्पूरमृगनाभिसमन्वितम् ।
विलेपनं गृहाणाशु नमस्ते भक्तवत्सले ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ।
हळदकुंकू - (हळदकुंकू वाहावे.) -
हरिद्रा स्वर्नवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी ।
सर्वालंकारमुख्या हि देवि त्वं प्रतिगृह्यताम् ॥
हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकम् ।
वस्त्रालंकारभूषार्थं देवि त्वं प्रतिगृह्यताम् ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । हरिद्राकुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ।
सिंदूर - (सिंदूर वहावा.) -
उदितारुणसंकाशं जपाकुसुमसंनिभम् ।
सीमंतभूषणार्थाय सिंदूरं प्रतिगृह्यताम् ॥
श्रीमहालक्षीसरस्वतीभ्यां नमः । सिंदूरं समर्पयामि ।
परिमलद्रव्ये (अत्तर, अबीर, अष्टगंध, देवीवर व वह्यांवर वाहावे.) -
ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे ।
नानापरिमलद्रव्यं गृहाण परमेश्वरि ।
तैलानि च सुगंधिनि द्रव्याणि विविधानि च ।
मया दत्तानि लेपार्थं गृहाण परमेश्वरि ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि ।
फुले - (देवीला फुले वाहावीत.)
मंदारपारिजातादीन् पाटलीं केतकीं तथा ।
मरुवामोगरं चैव गृहाण परमेश्वरि ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । पूजार्थे कालोद्भवपुष्पाणि समर्पयामि ।
धूप - (उदबत्ती, घंटानाद करीत ओवाळावी.) -
वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः ।
आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । धूपं समर्पयामि ।
दीप - (निरांजन, घंटानाद करीत ओवाळावे.) -
कार्पासवर्तिसंयुक्तं घृतयुक्तं मनोहरम् ।
तमोनाशकरं दीपं गृहाण परमेश्वरि ।
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । दीपं समर्पयामि ।
नैवेद्य - (साखरफुटाणे, बत्तासे, पेढे- जो नैवेद्य असेल तो पात्रात देवीपुढे ठेवावा. पात्राखाली पाण्याने लहानसा चौकोन करून वर पात्र ठेवावे. नैवेद्यावर तुलसीदलाने उदक प्रोक्षण करावे. प्राणाय स्वाहा इत्यादि प्रत्येक स्वाहाकार म्हणताना देवीला उजव्या हाताने नैवेद्य भरवीत आहोत अशी कृती करावी. नैवेद्यावर पळीभर पाणी उजव्या हाताने फिरवावे.) -
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । (पदार्थाचे नाव )
नैवेद्यं समर्पयामि । ऋतं त्वा सत्येन परिषिंचामि ।
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा ।
ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।
(एक एक पळी पाणी ताम्हनात सोडावे)
उत्तरापोशनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि । हस्तप्रक्षालनं समर्पयामि ।
(पुन्हा पळीभर पाणी ताम्हनात सोडावे)
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । आचमनीयं समर्पयामि ।
(गंध फुलाने वाहावे.)
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।
तांबूल - (विड्याची दोन पाने त्यावर सुपारी ठेवून देवीसमोर ठेवावी व त्यावर पळीभर पाणी सोडावे.)
एलालावंगकर्पूर - नागपत्रादिभिर्युतम् ।
पूगीफलेन संयुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम् ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । मुखवासार्थे पूगीफल तांबूलं समर्पयामि
दक्षिणा - (देवीसमोर पानसुपारीवर दक्षिणाद्रव्य ठेवून त्यावर तुलसीदल, फूल ठेवून उजव्या हाताने पळीभर पाणी सोडावे.) -
हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः ।
अनन्तपुण्यफलदमतः शांति प्रयच्छ मे ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि ॥
फळे - (देवीला यथाशक्य पक्व फळे अर्पण करावीत. ती देवीपुढे ठेवून त्यावर उजव्या हाताने पळीभर पाणी वाहावे.)
फलेन फलितं सर्व त्रैलोक्यं सचराचरम् ।
तस्मात्फलप्रदानेन सफलाः स्युर्मनोरथाः ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । ऋतुलब्धानि फलानि समर्पयामि ।
कापूरारती - (कापूर आरती ओवाळावी. त्यावेळी घंटा वाजवावी.)
ह्रत्स्थाज्ञानतमोनाशक्षमं भक्त्या समर्पितम् ।
कर्पूरदीपममलं गृहाणं परमेश्वरि ।
(यानंतर कापूरारति ओवाळीत 'दुर्गे दुर्घट भारी' ही आरती उपस्थित सर्वजणांनी म्हणावी व नंतर मंत्रपुष्पांजली वाहाण्यासाठी पूजकाने त्यांच्या हातात एकेक पुष्प द्यावे.)
मंत्रपुष्पांजलि - 'ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त० पासून सभासद इति ।" पर्यंतचे मंत्र सर्वांनी यथाशक्य सुस्वर म्हणावेत व हातातील फुल एकेकाने देवीवर वाहावीत. त्यावेळी लक्ष्मीगायत्री मंत्र म्हणावा.
लक्ष्मीगायत्री - ॐ महालक्ष्मी च विद्महे, विष्णुपत्नी च धीमहि । तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ।
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । मंत्रपुष्पं समर्पयामि ।
प्रदक्षिणा-नमस्कार-प्रार्थना (स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी व देवीला साष्टांग नमस्कार करावा.)-
यानि कानि च पापानि ब्रह्महत्यासमानि च ।
तानि तानि विनश्यंति प्रदक्षिणपदे पदे ॥
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । प्रदक्षिणां समर्पयामि । नमस्करोमि ।
शेष राजोपचार - (गंधाक्षता व फूल वाहावे व देवीला नमस्कार करावा.)-
श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । छत्रं चामरं गीतं नृत्यं वाद्यमान्दोलनमित्यादि सर्वराजोपचारार्थे गंधपुष्पाक्षतान् समर्पयामि ।
अनेन कृतपूजनेन श्रीमहालक्ष्मीसरस्वत्यौ प्रीयताम् ।