श्रीलक्ष्मीसरस्वती - इत्यादि देवता पूजा

दिपावली म्हणजे दीपोत्सव हा उत्सव साजरा करुन भोवतालचा अंधार नाहीसा करणे आणि प्रकाशाच्या वाटेने जाणे.


श्रीलक्ष्मीसरस्वती - इत्यादि देवता पूजा

कलशाजवळच जमाखर्चाच्या वह्या, लेखणी, दौत, तराजू, वजने इत्यादि ठेवावे. वह्या त्यांचे पहिले पान उघडून ठेवाव्यात. लक्ष्मी-कुबेर व सरस्वतीस्वरूप म्हणून

१) चांदीचे लक्ष्मी छापाचे नाणे

२) सुवर्णादि धातूचे दागिने

३) लक्ष्मी व सरस्वती मूर्ती

४) लक्ष्मी व सरस्वती यांच्या तसबिरी ठेवाव्यात. मूर्ती किंवा नाणे ताम्हनात तांदळावर ठेवावे. दागिने पाटावर वस्त्र घालून त्यावर ठेवावेत. तसबिरी पाटावर, चौरंगावर किंवा भिंतीला टेकून ठेवाव्यात.

श्रीलक्ष्मीध्यान

या सा पद्मासनस्था विपुलकटितटी पद्मपत्रायताक्षी ॥

गंभीरावर्तनाभिः स्तनभरनमिता शुभ्रवस्त्रोत्तरीया ॥

या लक्ष्मीर्दिव्यरूपैर्मणिगणखचितैः स्नापिता हेमकुंभैः ।

सा नित्यं पद्महस्ता मम वसतु गृहे सर्वमांगल्यमस्तु ॥

नमो दैव्ये महादेव्यै शिवायै सततं नमः ।

नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥

या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता ।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥

श्रीसरस्वतीध्यान

नमस्ते शारदे देवि काश्‍मीरपुरवासिनि ।

त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । ध्यानं समर्पयामि ।

आवाहन -

(देवीवर अक्षता वाहाव्यात.)

सर्वलोकस्य जननी शूलहस्तां त्रिलोचनाम् ।

सर्वदेवमयीमीशां देवीमावाहयाम्यहम् ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्या नमः । आवाहयामि ।

आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि ।

आसन -

(देवीच्या मूर्तीखाली अक्षता ठेवाव्यात.)

तप्तकांचनवर्णाभं मुक्तामणिविराजितम् ।

अमलं कमलं दिव्यामासनं प्रतिगृह्यताम् ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । आसन समर्पयामि ।

(आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।)

पाद्य -

(पळीभर पाणी फुलाने शिंपडावे.)

गंगादितीर्थसंभूत गंधपुष्पाक्षतैर्युतम् ।

पाद्यं ददाम्यहं देवि गृहाणाशु नमोऽस्तु ते ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । पादयोः पाद्यं समर्पयामि ।

अर्घ्य -

(पळीभर पाण्यात गंध अक्षता घालून ते फुलाने शिंपडावे.)

अष्टगंधसमायुक्तं स्वर्णपात्रप्रपूरितम् ।

अर्घ्यं गृहाण मद्दत्तं महालक्ष्मि नमोऽस्तु ते ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । अर्घ्यं समर्पयामि ।

आचमन -

(फूलाने पाणी शिंपडावे.)

सर्वलोकस्य या शक्तिर्ब्रह्मविष्ण्वादिभिः स्तुता ।

ददाम्याचमनं तस्यै महालक्ष्म्यै मनोहरम् ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः । आचमनीय़ं समर्पयामि ।

पंचामृतस्नान -

देवीची मूर्ती असेल तर ती ताम्हनात घेउन तीवर पंचामृतातील दूध, दही, तूप, मध व साखर हे पदार्थ एकेक, पुढीलप्रमाणे वाहावेत. प्रत्येक पदार्थानंतर शुद्धोदक अर्पण करावे. तसबीर असेल तर पंचामृताचे पदार्थ फुलाने किंचित् शिंपडावेत व शुद्धोदक उजव्या हाताने ताम्हनात सोडावे.

पंचामृतसमायुक्तं जान्हविसलिलं शुभम् ।

गृहाण विश्वजननि स्नानार्थं भक्तवत्सले ॥

पयो दधि घृत चैव मधुशर्करया युतम् ।

पंचामृतेन स्नपनं क्रियतां परमेश्वरि ॥

श्रीमहालक्ष्मीसरस्वतीभ्यां नमः ।

(या मंत्राने पुढील क्रमाने एकैकशः पंचामृत व जल अर्पण करावे.) -

१) श्रीमहा० पयःस्नानं समर्पयामि । शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।

२) श्रीमहा० दधिस्नानं समर्पयामि । शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।

३) श्रीमहा० घृतस्नानं समर्पयामि । शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।

४) श्रीमहा० मधुस्नानं समर्पयामि । शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।

५) श्रीमहा० शर्करास्नानं समर्पयामि । शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।

६) श्रीमहा० गंधोदकस्नानं समर्पयामि ।

७) श्रीमहा० शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।

८) (अत्तर फुलाने लावावे) - श्रीमहा० मांगलिकस्नानं समर्पयामि ।

९) (पाणी गरम करून ते वाहावे.) श्रीमहा० उष्णोदकदकस्नानं समर्पयामि ।

१०) (गंधफूल वाहावे.) श्रीमहा० सकलपूजार्थे गंधपुष्पं समर्पयामि ।


References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP